शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
2
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
3
‘काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात भाजपाच काँग्रेसयुक्त झाला; भाजपाकडे नेतृत्व, कार्यकर्त्यांचा अभाव,’’ हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला   
4
“सगळीकडे हीच चर्चा, मतचोरीविरोधात जनता राहुल गांधींसोबत, संपूर्ण देश म्हणणे ऐकतोय”: काँग्रेस
5
आई दुसऱ्यांकडे काम करायची, वडील विटा उचलायचे; २२ व्या वर्षी लेक देशातील सर्वात तरुण IPS
6
महुआ मोईत्रा बेशुद्ध झाल्या, राहुल गांधींनी पाणी दिले; टीएमसीची आणखी महिला खासदार...
7
Viral Video: मध्यरात्री शौचालयासाठी बाहेर पडला, अचानक समोर दिसला बिबट्या, पहारेकरीसोबत असं घडलं की...
8
‘माझी पत्नी बाहेरच्या लोकांना घरी बोलावते’, व्हिडीओमध्ये सांगून पतीनं उचललं भयानक पाऊल...  
9
बर्फाळ टेकडीवर वसलाय 'हा' छोटासा देश! स्वतःचा झेंडा, ध्वज आणि पासपोर्टची सुविधा देखील उपलब्ध; तुम्हाला माहितीये का?
10
१२ लाखांपर्यंतची करसवलत रद्द होणार का? नव्या आयकर विधेयकावरुन सरकारने केला खुलासा
11
Gold Silver Price 11 August: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅम GOLD साठी किती खर्च करावा लागणार?
12
"जोपर्यंत लोकांच्या मनात निवणुकीच्या निष्पक्षतेबाबत संशय राहील तोपर्यंत...’’, शशी थरूर यांचं विधान  
13
ही कसली आई! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी स्वतःच्या ५ महिन्यांच्या लेकीची केली हत्या
14
"हे देवा, त्यांनी आता बोलणं थांबवावं", डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत सनी लिओनीचं स्पष्ट मत, म्हणाली- "त्यांच्या काही गोष्टी..."
15
Turkey Earthquake: तुर्कीत ६.१ रिश्टर स्केलचा भूकंप, २० सेकंदाचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
16
जुही बब्बरने भावाला बांधली राखी, प्रतीक बब्बरची अनुपस्थिती; भावुक पोस्ट करत म्हणाली...
17
Navi Mumbai: नेरुळमधील सुश्रुषा हाॅस्पिटलला आग, रुग्णांची सुखरूप सुटका
18
मौतका कुआ : बापाचा 'लाडला', जोरदार पडला...! स्टंट करणं पडलं भारी, दिवसाढवळ्या दिसले असतील तारे; VIDEO व्हायरल
19
कुत्रा, मांजर विसरा..; विद्यार्थ्याने शाळेत आणला हत्ती, पाहून सर्वांनाच बसला धक्का; पाहा video
20
NSDL Share Price: 'या' IPO चे गुंतवणुदार झाले मालामाल; ४ दिवसांत ७८% चा छप्परफाड रिटर्न; लिस्टिंगनंतर लागला जॅकपॉट

खेड तालुक्यातील आंबेठाण परिसरात कडाक्याच्या थंडीने पिकांचे नुकसान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 19:28 IST

पुणे जिल्ह्यातही चार पाच दिवसांपासून आंबेठाण परिसरात रात्रीच्या वेळी गार वाऱ्यासह कडाक्याची थंडी पडत असल्याने पानावर दवबिंदू गोठून पिकांचे मोठे नुकसान झाले.

ठळक मुद्देआंबा,कांदा, ज्वारी,हरभरा,गहू तसेच रब्बी पीके धोक्यात

आंबेठाण : चार पाच दिवसांपासून आंबेठाण परिसरात कडाक्याची थंडी पडत असल्याने पानावर दवबिंदू गोठून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.यामध्ये ज्वारी,हरभरा,गहू,कांदा तसेच रबी पीके करपली.यात काही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.यामध्ये नुकसान झालेल्याची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी संबधित शेतकऱ्यांनी केली आहे.     उत्तर भारतात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडून,बर्फवृष्टी झाल्याने पुणे जिल्ह्यातही चार पाच दिवसांपासून आंबेठाण परिसरात रात्रीच्या वेळी गार वाऱ्यासह कडाक्याची थंडी पडत असल्याने पानावर दवबिंदू गोठून पिकांचे मोठे नुकसान झाले.यामध्ये अनेक शेतकऱ्यांची आंबा,कांदा, ज्वारी,हरभरा,गहू तसेच रबी पिके करपली. यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.गेली काही दिवसांपासून  कडाक्याची थंडी पडल्याने शीतलहर निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले.यामध्ये बटाटा,कांदा,हरभरा,ज्वारी, गहू,पालेभाज्या आदी पिकांना फटका बसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. आंबेठाण येथील प्रगतशील शेतकरी सचिन लक्ष्मण मांडेकर यांच्या शेतातील हिरवेगार ज्वारीचे पीक दवामुळे करपले आहे.सकाळी हिरवेगार असणारे ज्वारीचे पीक ऊन पडताच कोमेजून जाऊन संपूर्ण ज्वारीचे उभे पीक पिवळे पडले आहे.याबाबत महसूल विभागाने पाहणी करून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी सदर शेतकऱ्यांनी केली. 

टॅग्स :KhedखेडWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनagricultureशेतीFarmerशेतकरी