दौंड, इंदापूरला पिके जळाली

By Admin | Updated: August 18, 2014 05:12 IST2014-08-18T05:12:38+5:302014-08-18T05:12:38+5:30

जिल्ह्यात पावसामुळे कही खुशी कही गम अशी अवस्था झाली आहे. जून-जुलै महिन्यात पावसाने दडी मारल्याने सर्वच तालुक्यात शेती आणि पिण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता

Crocodile crop in Daund, Indapur | दौंड, इंदापूरला पिके जळाली

दौंड, इंदापूरला पिके जळाली

जिल्ह्यात पावसामुळे कही खुशी कही गम अशी अवस्था झाली आहे. जून-जुलै महिन्यात पावसाने दडी मारल्याने सर्वच तालुक्यात शेती आणि पिण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर त्याचे आगमन झाले पण जिल्ह्याच्या काही भागातच. बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदरकरांची त्याने यंदाही निराशाच केली. 'लोकमत'ने दौंड, इंदापूरमध्ये केलेल्या पाहणीत पाणीप्रश्न गंभीर बनत असल्याचे दिसले. उभी पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. मनोहर बोडखे गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत या वर्षी फक्त ५५ ते ६0 मिलिमीटर पाऊस दौंड तालुक्यात झाला आहे. त्यामुळे शेतातील पीके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. मुळशी तालुका : हंगाम लांबला
या वर्षी पावसाने तब्बल दीड महिना दडी मारल्याने भात लागवडीचा हंगाम लांबला आहे. मात्र, भातपिकास वरदान ठरलेल्या चारसूत्नी पद्धतीने भात लागवड करण्याच्या प्रमाणात दर वर्षीच्या तुलनेत यंदा दीड पटीने वाढ झाली आहे. भोर तालुका : ८0 टक्के लागवड
तालुक्यातील खरीप हंगामातील कडधान्य, गळीत धान्य व तृणधान्याची १६,४00 हेक्टर क्षेत्रापैकी १३,२७३ हेक्टरवर म्हणजे ८0 टक्के लागवड पूर्ण झाली आहे. त्यात सर्वाधिक भात, भुईमूग, घेवडा, सोयाबीनचा समावेश आहे . कळस : इंदापूर तालुक्यातील अवर्षणप्रवण भागात पावसाने ओढ दिल्याने दुष्काळाची छाया गडद होत आहे. खरीप हंगाम वाया गेल्याने सुमारे छत्तीस गावांमधील शेती अडचणीत आली आहे.
मागील तीन वर्षांपासून दुष्काळाची दाहकता सहन करावी लागत असल्याने कायमस्वरूपी सिंचनाची उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. तालुक्यामध्ये उत्तरेला उजनी जलाशय, दक्षिणेला नीरा नदी, पूर्वेकडे भीमा नदी आहे. तालुक्याच्या तिन्ही बाजुंनी पाणी आहे. तसेच खडकवासला साखळी प्रकल्प व भाटघर, वीर धरणाचे पाणी कालव्यातून तालुक्यातील सिंचनासाठी वापरले जाते. मात्र नीरा-डावा कालव्याने सिंचन हे दक्षिण बाजूला आहे. तर खडकवासला कालव्याचे सिंचन हे उत्तरेला आहे. यामुळे तालुक्याच्या काही भागाला पाणी मिळते तर काही भाग सिंचनासाठी पावसावर अवलंबून आहे. या परिसरातील लाकडी, निंबोडी, निरगुडे, लामजेवाडी, वायसेवाडी, शिंदेवाडी, काझड, धायगुडेवाडी , कळस, बिरगुडी, बोरी, पिलेवाडी, रूई, थोरातवाडी, कडबनवाडी, भरणेवाडी, कौठडी, या भागातील शेती अडचणीत आली आहे. त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना करणयची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
लाकडी -निंबोडी उपसासिंचन योजना, निमगाव केतकी येथील केतकेश्‍वर उपसासिंचन योजना तसेच नीरा डावा कालव्यावरील योजना मार्गी लावण्याची गरज आहे. (वार्ताहर) पर्जन्यमान घटले
दौंड तालुक्यात सरासरी ४00 मिलिमीटर पावसाची आवश्यकता आहे. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत या वर्षी फक्त ५५ ते ६0 मिलिमीटर पाऊस तालुक्यात झाला आहे. गेली दोन वर्षे सरासरी ३00 च्या जवळपास पाऊस झाला होता. तालुक्यात ५ हजार ४७८ हेक्टर खरिपाचे क्षेत्र असून, पावसाअभावी पेरण्या कमी झाल्या आहेत. ऊस आणि बाजरी ही मुख्य पिके असल्याचे तालुका कृषी अधिकारी प्रदीप घाडगे यांनी सांगितले.

 तालुक्यातील जिरायत पट्टय़ातील डाळिंब, ताम्हाणवाडी, खोर, देऊळगावगाडा, पडवी, कुसेगाव, रोटी, वासुंदे या गावांसह वाड्यावस्त्यांसाठी ९ टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याचे तहसीलदार उत्तम दिघे यांनी सांगितले. दौंड : गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत या वर्षी फक्त ५५ ते ६0 मिलिमीटर पाऊस तालुक्यात झाला आहे. त्यामुळे शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
ऑगस्ट संपत आला, तरी दौंड तालुक्यात पावसाचा पत्ता नाही. काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. त्यामुळे उभी पिके जळून चालली आहेत. मुळा-मुठा, भीमा नदीला पाणी सोडल्यामुळे नदीकाठच्या गावातील शेतीच्या पिकांना जीवदान मिळाले आहे.
ऐन पावसाळ्यात जिरायत पट्टय़ातील गावांसह वाड्यावस्त्यांना ९ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. काही भागात मुबलक पाणी असताना विजेच्या लपंडावामुळे पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थ मटाकुटीस आला आहे.
तालुक्याला पाच आर्वतने मिळायची. आता हे प्रामण तीनवर आले आहे. जिरायत पट्टय़ात जनाई-शिरसाई योजनेचे पाणी सोडले; मात्र हे पाणी फक्त वासुंदे येथील तलावात आले.
मात्र, परिसरातील काही तलाव कोरडेच आहेत. त्यामुळे खरिपांच्या पेरण्या झाल्या नाहीत, तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. (वार्ताहार) जिल्ह्यात पावसामुळे कही खुशी कही गम अशी अवस्था झाली आहे. जून-जुलै महिन्यात पावसाने दडी मारल्याने सर्वच तालुक्यात शेती आणि पिण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर त्याचे आगमन झाले पण जिल्ह्याच्या काही भागातच. बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदरकरांची त्याने यंदाही निराशाच केली. 'लोकमत'ने दौंड, इंदापूरमध्ये केलेल्या पाहणीत पाणीप्रश्न गंभीर बनत असल्याचे दिसले. उभी पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत.

Web Title: Crocodile crop in Daund, Indapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.