शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Video : मानवाचा मित्र असलेल्या वटवाघुळांच्या ‘घरांवर’ संकट; कोरोना पसरत असल्याचा चुकीचा समज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 18:11 IST

कोरोना पसरत असल्याचा चुकीचा समज : अनेक ठिकाणी तोडताहेत झाडं...

श्रीकिशन काळे     पुणे : कोरोना वटवाघुळांमुळे होतो, या गैरसमजातून शहरात अनेक ठिकाणी झाडं तोडली जात आहेत. खरंतर वटवाघळाने कोरोना होत नसून, उलट रात्री मानवाला उपद्रवी ठरणार्या  कीटकांचा ते नायनाट करतात. त्यामुळे ते मानवाचे मित्रच आहेत. त्यांचे घर असणारी झाडं तोडू नयेत, असे आवाहन पर्यावरण अभ्यासकांनी केले आहे. 

चीनमध्ये वटवाघुळामुळे कोरोना आल्याचे बोलले जाते, पण अजून सिद्ध झाले नाही. परंतु याचा परिणाम मात्र पुण्यात दिसून येत आहे. झाडांवर वटवाघुळ बसून ते कोरोना आपल्या घरात येईल, या भितीने लोकं झाडं तोडत आहेत. बिबवेवाडी, सहकारनगर २, कर्वे रस्ता, कर्वेनगर परिसरात अशा घटना झाल्या आहेत. 

वटवाघळावर संशोधन करणारे डॉ. महेश गायकवाड म्हणाले, भारतात विमानाने कोरोना आला, वटवाघळाने नाही. भारतीय वटवाघळाने कोरोना पसरत नाही. खरं तर आपल्यातील प्रतिकारशक्ती कमी झालीय, प्रदूषण वाढलेय यावर लक्ष द्यायला हवे. उलट वटवाघुळ हे रात्री आपलं अन्न खातं आणि दिवसा झाडावर झोपते. डास आणि शेतीला अपाय करणारे व इतर कीटक ते खातात, जे आपल्याला घातक आहेत. बिया खाऊन ते इतरत्र टाकतात, त्याने मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण होते. रात्री खाद्य शोधताना वटवाघुळ त्याच्याकडील अल्ट्रा सोनिक सिस्टिम सुरू करतो. ते रडारचे काम करते. कीटक किंवा डास असल्यास त्यावर ते प्रकाश टाकून ते खाऊन टाकतात.=========================

वटवाघुळ पक्षी नसून, सस्तन प्राणी आहे. यामध्ये सुमारे ९७ टक्के पांढऱ्या पेशी असून, मानवात ३० टक्के असतात. जेव्हा ते उडतात तेव्हा त्यांच्या शरीराचे तापमान ४० डिग्री तापमान होते. त्यात कोणताही विषाणू जिवंत राहू शकत नाही. म्हणून त्यांच्याकडून कोरोना होणं शक्यच नाही. - डॉ. महेश गायकवाड, वन्यजीव संशोधक ==============================आमच्या इथे सहकारनगरमध्ये उंबराचे मोठे झाड होते. त्यावरील वटवाघुळांमुळे कोरोना पसरेल म्हणून ते तोडले.  खरंतर हा अतिशय चुकीचा समज आहे की, वटवाघुळामुळे कोरोना पसरतो. विनाकारण त्यांची झाडांवरील आश्रयस्थाने नष्ट केली जात आहेत. वन विभागाने पुढाकार घेऊन त्याबाबत निवेदन जाहीर करायला हवे की, वटवाघुळांमुळे कोरोना पसरत नाही. - शेखर नानजकर, संस्थापक, वाइल्ड संस्था ==============================

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याenvironmentपर्यावरण