शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
3
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
4
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
5
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
6
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
7
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
8
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
9
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
10
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
11
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
12
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
13
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
14
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
15
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
16
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
17
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
19
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
20
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला

पुण्यात सराईत गुन्हेगाराला अटक, दोन पिस्तुल, ४ काडतुसे जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 18:58 IST

गेल्या आठ महिन्यांपासून अनेक गंभीर गुन्ह्यात या आरोपीचा दत्तवाडी पोलीस शोध सुरु होता. परंतु, तो शिताफीने जागा बदलून पर्वती पायथा परिसरात राहत होता.

ठळक मुद्देआरोपीवर खुन, खुनाचा प्रयत्न,जबरी चोरी, घरफोडी असे २५ गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल

पुणे: दोन खुनासह, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी असे एकूण २५  गुन्हे दाखल असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला खडक व फरासखाना पोलिसांनी दत्तवाडी येथे अटक केली. त्यात दोन देशी बनावटीचे लोखंडी पिस्टल व चार काडतुसे असा एकूण एक लाखांचा शस्त्र जप्त केली. सुनिल उर्फ चॉकलेट सुन्या किशोर डोकेफोडे (वय३३,रा.लेन नं. ८, जयभवानीनगर, पर्वती पायथा, पुणे)असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पोलीस नाईक सचिन जाधव यांना त्यांच्या बातमीद्वारा मार्फत मिळालेल्या माहितीनुसार, एक इसम पर्वती पायथा इथे रस्त्यावर दोन देशी बनावटीचे लोखंडी पिस्टल घेवून उभा असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करुन या गुन्हेगाराला ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत चार काडतुसेही जप्त केली आहे. गेल्या आठ महिन्यांपासून अनेक गंभीर गुन्ह्यात या आरोपीचा दत्तवाडी पोलीस शोध सुरु होता. परंतु, तो शिताफीने जागा बदलून पर्वती पायथा परिसरात राहत होता. त्याच्यावर खुन, खुनाचा प्रयत्न,जबरी चोरी, घरफोडी असे २५ गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हर्षल कदम, दिनेश पाटील, सचिन जाधव, इम्रान शेख, रिजवान जिनेडी, सुभाषश पिंगळे, तुषार माळवदकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली. 

टॅग्स :Crimeगुन्हाArrestअटकPoliceपोलिस