शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये तडीपारांसह सराईत गुन्हेगार लागले ‘गळा’ ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 13:21 IST

कॉम्बिंग ऑपरेशन मंगळवारी रात्री दहा ते बुधवारी सायंकाळी चारच्या दरम्यान त्यानंतर बुधवारी रात्री दहा ते गुरुवारी दुपारी दोन वाजेपर्यंत राबविण्यात आले.

ठळक मुद्देहडपसर, मुंढवा, वानवडी, कोंढवा, मार्केटयार्ड, बिबवेवाडी पोलीस ठाणे आगामी लोकसभा निवडणुकांच्या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये या अनुषंगाने कारवाई

पुणे :  शहरात घडणाऱ्या गंभीर गुन्हे व आगामी निवडणूकांचे गांभीर्य लक्षात घेऊन परिमंडल पाचमधील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कॉम्बिंग  ऑपरेशन राबविण्यात आले. त्यावेळी पोलिसांना रेकॉर्डवरील १५५ गुन्हेगार मिळून आले. तर तडीपारीच्या काळात शहरात आलेले व  कोयते बाळगणारे, पिस्तूल बाळगणारे व पोलिसांना पाहिजे असलेले आरोपी मिळून आले. अशी माहिती परिमंडल पाचचे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी दिली.  आगामी लोकसभा निवडणुकांच्या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये या अनुषंगाने परिमंडल पाच अंतर्गत येणाऱ्या वानव़डी, मुंढवा, ह़डपसर, मार्केटयार्ड, बिबवेवाडी, कोंढवा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांच्या देखरेखीखाली कोंबींग परेशन राबविण्यात आले. हे कॉम्बिंग ऑपरेशन मंगळवारी रात्री दहा ते बुधवारी सायंकाळी चारच्या दरम्यान त्यानंतर बुधवारी रात्री दहा ते गुरुवारी दुपारी दोन वाजेपर्यंत राबविण्यात आले. त्यावेळी या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार, शस्त्रांचा वापर करून गुन्हे करणारे गुन्हेगार, जबरी चोरी, चोरी, घरफोडी करणारे, तडीपार, पाहिजे असलेले, फरार, व दोनपेक्षा अधिक गुन्हे असलेले आरोपी यांचा शोध घेण्यात आला. त्यावेळी पोलिसांनी अभिलेखावरील एकूण ४७९ आरोपी तपासण्यात आले. तर त्यापैकी १५५ आरोपी मिळून आले. शुभम पवार, शेखर चन्नापा शिंगे, शिवराज माने यांच्याकडे कोयते आढळून आले़ संदीप करुल (वय २८, रा़ कोंढवा) आणि आकाश ठाकुर (वय २५, रा़ मुंढवा) यांना तडीपार केलेले असतानाही ते पुणे शहरात आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन २ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ घरफोडीच्या गुन्ह्यातील व़ॉन्टेड असलेला तिलकसिंग गब्बरसिंग टाक (वय २७) याला अटक करण्यात आली.हे कॉम्बिंग आॅपरेशन अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड व दोन सहायक पोलीस आयुक्त, ४३ अधिकारी, १५५ कर्मचारी यांच्या पथकाने केली. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटक