रेकॉर्डवरील गुन्हेगारास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:10 IST2021-03-14T04:10:35+5:302021-03-14T04:10:35+5:30

पुणे : रेकॉर्डवरील गुन्हेगारास गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने लोखंडी कोयत्यासह अटक केली. त्याच्याविरूद्ध कोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये ...

Criminal on record arrested | रेकॉर्डवरील गुन्हेगारास अटक

रेकॉर्डवरील गुन्हेगारास अटक

पुणे : रेकॉर्डवरील गुन्हेगारास गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने लोखंडी कोयत्यासह अटक केली. त्याच्याविरूद्ध कोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अक्षय विष्णू कांबळे (वय २६ रा. पंचशीलनगर सम्राट चौक, येरवडा, कोरेगाव पार्क) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सद्यस्थितीत पोलिसांकडून तडीपार, पाहिजे, फरारी आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. शहरात गस्त घालत असताना पोलीस नाईक गणेश पाटोळे यांना रेकॉर्डवरील गुन्हेगार सार्वजनिक रस्त्यावर थांबला असून, त्याच्या हातात एक लोखंडी कोयत्यासारखे हत्यार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्यावर कोरेगाव पार्क येथे गुन्हा दाखल करून पुढील कार्यवाहीसाठी त्याला कोरेगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक जुबेर मुजावर, सहाय्यक पोलीस फौजदार दिलीप जोशी, पोलीस अंमलदार गणेश पाटोळे व श्रीकांत दगडे यांनी ही कारवाई केली.

-----------

Web Title: Criminal on record arrested