शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

भाडेतत्वावर गाड्या घेऊन अनेकांना गंडा घालणार्‍या दोघांवर वानवडी, वारजे, हवेलीत गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 11:49 IST

मेट्रो व इतर कंपन्यांमध्ये भाडेतत्वावर मोटारी लावतो, असे सांगून गाड्या घेेणाऱ्या आणि त्यांची परस्पर विक्री करण्याचा प्रकार समोर...

पुणे : मेट्रो व इतर कंपन्यांमध्ये भाडेतत्वावर मोटारी लावतो, असे सांगून गाड्या घेेणाऱ्या आणि त्यांची परस्पर विक्री करण्याचा प्रकार समोर आला असून त्यातून अनेकांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी वानवडी, वारजे, हवेली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भाडे तर नाही़ उलट गाडी परस्पर दुसर्‍याला विकली. आता फायनान्स कंपनीचा हप्ते भरण्यासाठी तगादा अशी अनेकांची अवस्था झाली आहे.

नमन सहानी (वय ३८, रा. स्काय वॉटर अपार्टमेंट, वानवडी) आणि कल्पेश पंगलेकर (रा. पुणे) अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांना चिंचवड पोलिसांनी अटक केल्यानंतर हा सर्व प्रकार पुढे आला असून फसवणुक केलेल्या काही गाड्या चिंचवड पोलिसांनी जप्त केल्या आहेत. 

याप्रकरणी विकास साठे (वय २४, रा. हांडेवाडी) यांनी वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. नमन सहानी हा मध्यस्थ एजंट म्हणून काम करतो़ त्याने फिर्यादी यांना दरमहा २५ हजार रुपये भाडे बँकेत जमा होईल, असा करार करुन घेऊन जानेवारी २१मध्ये त्यांच्याकडील ७ लाखांची मोटार आपल्या ताब्यात घेतली. त्यानंतर त्याने ती गाडी परस्पर दुसर्‍यांना विकली. फिर्यादी यांना १ लाख रुपये भाडेही दिले नाही. तसेच त्यांचे मित्र रामसिंग सुरजवंशी यांची मोटारही त्याने परस्पर विकली. चिंचवड पोलिसांनी या मोटारी जप्त केल्या आहेत. 

निखील काळभोर (वय ३३, रा. कर्वेनगर) यांनी वारजे पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची कार मेट्रोच्या कामात भाडेतत्वावर लावतो, असे सांगून भाडेकरार करुन त्यांच्याकडून कल्पेश पंगेरकर याने मोटार ताब्यात घेतली. ठरल्याप्रमाणे भाडे न देता ही कार परस्पर दुसर्‍याला विक्री करुन फिर्यादीची १० लाख रुपयांची फसवणूक केली. अशाच प्रकारे हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनी अनेकांची फसवणूक केली आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसcarकारfraudधोकेबाजी