आत्महत्याप्रकरणी जवानांवर गुन्हा

By Admin | Updated: June 25, 2017 04:48 IST2017-06-25T04:48:50+5:302017-06-25T04:48:50+5:30

सांगवी येथे काही दिवसांपूर्वी लष्करी जवानाच्या पत्नीने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच औंध लष्करी वसाहतीत राहणाऱ्या आणखी

Crimes against suicides | आत्महत्याप्रकरणी जवानांवर गुन्हा

आत्महत्याप्रकरणी जवानांवर गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : सांगवी येथे काही दिवसांपूर्वी लष्करी जवानाच्या पत्नीने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच औंध लष्करी वसाहतीत राहणाऱ्या आणखी एका जवानाच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. दोन्ही प्रकरणांत त्या जवानांवर पत्नीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत.
स्वाती अमोल जगदाळे (वय २७, रा. औंध लष्करी वसाहत) या महिलेने चार दिवसांपूर्वी आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वाती यांनी १९ जून रोजी राहत्या घरी गळफास घेतला होता. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, गुरुवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, चार दिवसांपूर्वीच सांगवी येथेही लष्करी जवानाची पत्नी ज्योती महागावकर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. एकाच आठवड्यात शहरात घडलेल्या या दोन घटनांमुळे खळबळ उडाली आहे. विवाहित महिलांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

Web Title: Crimes against suicides