शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

आघाडीच्या नेत्यांवरील गुन्हयांना पाठीशी घातलं जातंय; रघुनाथ कुचिकला तात्काळ अटक करा-तृप्ती देसाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 15:47 IST

गुन्हा अत्यंत गंभीर असून पीडित महिलेला लवकरात लवकर न्याय मिळावा

पुणे : लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीशी शारीरीक संबंध करुन तिला गरोदर केले. तसेच जबरदस्तीने गर्भपात करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कामगार नेते आणि शिवनेतेचे उपनेता याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा अत्यंत गंभीर असून पीडित महिलेला न्याय मिळावा यासाठी रघुनाथ कुचिक यांना तात्काळ अटक करणे गरजेचे आहे. अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी प्रशासनाकडे केली आहे. 

''याआधी महाविकास आघाडीतील नेते आणि मंत्र्यांवर गुन्हे दाखल झाले होते. परंतु त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला गेला. राज्य महिला आयोगाने दखल घेऊन कारवाईचे आदेश देणे गरजेचं असल्याचे यावेळी त्या म्हणाल्या आहेत.'' 

''चोवीस वर्षीय महिलेशी वारंवार पुणे आणि गोवा येथे बलात्कार करून संबंधित महिलेचा गर्भपात करून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा पुणे शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे दाखल झालेला आहे. हा गुन्हा अत्यंत गंभीर असून पीडित महिलेला न्याय मिळावा यासाठी रघुनाथ कुचिक यांना तात्काळ अटक करणे गरजेचे आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.''  

काय आहे प्रकरण? 

रघुनाथ कुचिक हे कामगार क्षेत्रात कार्यरत असून शिवसेनेचे उपनेते आहेत़. त्याने महिलेशी प्रेमसंबंध निर्माण करुन लग्नाचे आमिष दाखवले. तिच्यासोबत वेगवेगळ्या ठिकाणी शारीरीक संबंध प्रस्थापित केले. त्यातून त्या गरोदर राहिल्या. तेव्हा त्यांची संमती नसताना जबरदस्तीने गर्भपात करुन तसेच या बद्दल कोणाला काही सांगितले तर तुला मारुन टाकील, अशा धमक्या दिल्या आहेत.तसेच फियार्दी यांची तब्येत ठीक नसताना महिलेकडून समजूतीचे करारनाम्यावर सह्या करुन घेतली आहे.

टॅग्स :PuneपुणेShiv SenaशिवसेनाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीPoliceपोलिसArrestअटक