शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

'डीएसकें'वरील गुन्हे लवकरात लवकर सिद्ध करावेत; ठेवीदारांच्या वकिलांचे पोलिस आयुक्तांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 10:50 IST

ॲड. बिडकर यांनी पत्रात नमूद केले आहे की, डीएसके यांनी जवळपास ३५ हजार ठेवीधारकांची फसवणूक केली आ

पुणे : ठेवीधारकांची फसवणूक केल्याप्रकरणी दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांच्यावर जवळपास ११ कलमांसह एमपीआयडी ॲक्टच्या ३ व ४ कलमांतर्गत गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर पुरवणी दोषारोपपत्र दाखल झाले आहे. पण त्यांच्यावरील गुन्हे पोलिसांकडून सिद्ध झाले नसल्याने या प्रकरणाची सुनावणी सुरू होण्यास सात वर्षांत मुहूर्त लागलेला नाही. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त आणि विशेष सरकारी वकील यांनी डीएसके यांच्यावरील गुन्हे लवकरात लवकर सिद्ध करावेत आणि गुन्ह्यासंबंधी डीएसके यांचे रेकॉर्डिंग जलदगतीने करण्याचे सूचित करावे, अशा आशयाचे पत्र डीएसके ग्रुपच्या २४५ ठेवीधारकांच्या वतीने ॲड. चंद्रकांत बिडकर यांनी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना पाठविले आहे.

ॲड. बिडकर यांनी पत्रात नमूद केले आहे की, डीएसके यांनी जवळपास ३५ हजार ठेवीधारकांची फसवणूक केली आहे. ठेवीधारकांचे ११५३ कोटी रुपये परत मिळण्याच्या दृष्टीने पोलिसांचे सहकार्य अपेक्षित आहे. सध्या डीएसके यांची येरवडा कारागृहातून जामिनावर मुक्तता झाली आहे. डीएसके यांनी ठेवीदारांना दिलेले धनादेशही बाउन्स झाले आहेत. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट १८८१ च्या १३८ व १४१ नुसार हा गुन्हा आहे. ५४ याचिकाकर्ते, ३५ हजार ठेवीदार आणि अल्पमुदतीच्या ठेवीदारांच्या वतीने सांगू इच्छितो की, यातील दोनशे ठेवीदारांचा मृत्यू झाला आहे आणि एकाने आत्महत्या केली.

यात ७५ टक्क्यांपेक्षा अधिक ठेवीदार हे ज्येष्ठ नागरिक आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी रक्कम डीएसके कंपनीमध्ये गुंतवली होती. त्यामुळे माझी विनंती आहे, की सहायक पोलिस आयुक्त राजे मोहम्मद आणि विशेष सरकारी वकील कैलासचंद्र व्यास यांना सूचना द्याव्यात आणि सहा महिन्यांत हे प्रकरण निकाली काढावे व ठेवीदारांना ११५३ कोटी रुपये परत करावेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी