शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

वाकड, हिंजवडीत पेट्रोलपंपाच्या मालकांवर गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2020 12:59 IST

अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच इंधन विक्री करण्यात यावी, असे शासनाकडून निर्देश

ठळक मुद्देकोरोना साथ आटोक्यात आणण्यासाठी संचारबंदी

कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील वाहनांखेरीज इतर कोणत्याही वाहनांसाठी इंधन विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचा भंग करून सर्व वाहनांसाठी इंधन दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोन पेट्रोल पंपांच्या मालकांविरोधात वाकड व हिंजवडी पोलीस ठाण्यात दोन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

प्रकाश रामचंद्र बालवडकर (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) व धर्मेंद्र हिडनारायण दुबे (रा. दुबे बिल्डींग, कामगार नगर, पिंपरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. कोरोना साथ आटोक्यात आणण्यासाठी संचारबंदी करण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच इंधन विक्री करण्यात यावी, असे निर्देश शासनाकडून देण्यात आले आहेत. मात्र त्याचे उल्लंघन करून सर्व वाहनचालकांना इंधनाची विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिला प्रकार वाकड येथील उड्डाणपुलाजवळील बालवडकर पेट्रोल पंप येथे मंगळवारी (दि. 24) रात्री उघडकीस आला. आरोपी प्रकाश बालवडकर हा शासनाच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करून त्याच्या मालकीच्या बालवडकर या पेट्रोल पंपावर सर्व वाहनचालकांना पेट्रोलची विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पेट्रोल पंपावर धाव घेतली. हा पंप माझ्या मालकीचा आहे, मी काय करायचे ते करेन, तुम्ही निघून जावा, नाहीतर तुमचे काही खरे नाही. मी कोण आहे हे तुम्हाला माहिती नाही, तुमची नोकरी घालवू शकतो, असे म्हणून आरोपी बालवडकर याने पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केला. वाकड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. 24) फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी बालवडकर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.  

दुसरा प्रकार हिंजवडी- माण रस्त्यावर शुक्रवारी (दि. 27) घडला.  पोलीस नाईक कुणाल दिलीप शिंदे यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शासनाच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करून आरोपी धर्मेंद्र दुबे याने हिंजवडी - माण रस्त्यावरील त्याच्या गायत्री पेट्रोल पंपावर दुपारी अडीचच्या सुमारास सर्व वाहनांसाठी इंधन विक्री केली. त्यामुळे पेट्रोल पंपावर वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. त्यामुळे दुबे याच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेPetrol Pumpपेट्रोल पंपCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिसcollectorजिल्हाधिकारी