शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

सणसवाडीत जमिनीच्या वादातुन ३२ जणांवर गुन्हे दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 20:35 IST

भावकीतील शेताच्या वादातून वाद न्यायालयात प्रलंबित असताना देखील उभ्या पिकाच्या शेतामध्ये पाच ट्रॅक्टर घुसवून ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतातील ऊस व भुईमुग पीक नांगरून शिवीगाळ दमदाटी करण्यात आली.

ठळक मुद्दे२०१३ पासून न्यायालयात दावा दाखल

कोेरेगाव भीमा : सणसवाडी (ता. शिरूर ) येथील भावकीतील शेताच्या वादातून वाद न्यायालयात प्रलंबित असताना देखील उभ्या पिकाच्या शेतामध्ये पाच ट्रॅक्टर घुसवून ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतातील ऊस व भुईमुग पीक नांगरून शिवीगाळ दमदाटी केल्याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून यामध्ये एका बाजूच्या सत्तावीस व दुसऱ्या बाजूच्या तीन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरूर) येथील अशोक दरेकर व अजित दरेकर यांची वडिलोपार्जित जमीन असून दोघांकडे देखील एकमेकांचे क्षेत्र वहिवाटीस आहे. त्यांच्यामध्ये २०१३ पासून न्यायालयात दावा दाखल आहे. परंतु १९ मे रोजी अजित हिरामन दरेकर यांच्यासह आदींनी अशोक दरेकर यांच्या शेतात पाच ट्रॅक्टर घुसवून ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतातील ऊस व भुईमुग पीक नांगरण्यास सुरवात केली. यावेळी अशोक दरेकर यांनी तेथे जात पाहणी केली असता त्यांना पंचवीस तीस जण तेथे असल्याचे दिसले. त्यावेळी त्यांनी तेथे असलेल्या लोकांना शेतातील पिकांचे नुकसान करू नका अशी विनंती केली असता त्यांनी अशोक दरेकर यांना शिवीगाळ, दमदाटी करत हातपाय तोडून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत अशोक तुकाराम दरेकर यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी अजित हिरामण दरेकर, आशा सोमनाथ दरेकर, संगिता लालाराम दरेकर, शरद पठाण दरेकर, अरुण हिरामन दरेकर, भानुदास पठाण दरेकर, शामराव नामदेव दरेकर, राहुल शामराव दरेकर, पंकज शामराव दरेकर, कुसूम बाळासाहेब दरेकर आदी जणांवर (सर्व रा. सणसवाडी पाटीलवस्ती ता. शिरूर) यांच्यावर गुन्हे दाखल केले आहे.       पुष्पा भानुदास दरेकर यांनी दिलेल्या फिर्यादीत पुष्पा दरेकर व त्यांच्या घरातील महिला शेतात काम व ट्रॅक्टर चालक नांगरणी करत असताना अशोक दरेकर, राजेंद्र दरेकर व विकास दरेकर हे हातामध्ये काठ्या व लोखंडी गज घेऊन त्याठिकाणी आले व त्यांनी ट्रॅक्टर चालकाला नांगरणी करायची नाही. ट्रॅक्टर बंद करा असा दम दिला त्यावेळी पुष्पा दरेकर व महिलांनी त्यांना तुम्ही असे का म्हणता हे शेत आमच्या मालकीचे आहे असे म्हटले असता त्यांना हाताने मारहाण करत शिवीगाळ, दमदाटी करून महिलांच्या मनाला लज्जा उत्पन्न होईन असे कृत्य केले. याबाबत शिक्रापूर पोलिसांनी अशोक तुकाराम दरेकर, राजेंद्र दत्तात्रय दरेकर, विकास सुदाम दरेकर (सर्व रा.सणसवाडी पाटील वस्ती ता. शिरूर जि. पुणे ) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवशांत खोसे व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जयप्रकाश चव्हाण हे करत आहे.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावCrimeगुन्हाPoliceपोलिसCourtन्यायालय