शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: पुण्यातील खासगी शिकवणीत घडला भयंकर प्रकार..! ऑफिस बॉयकडून व्हिडिओ काढत विद्यार्थ्यावर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 11:33 IST

Crime News - मुलगा इयत्ता ८ वीमध्ये शिकत असून तो खासगी शिकवणीसाठी मार्केट यार्ड भागातील एका क्लासमध्ये जात होता

पुणे : खासगी शिकवणीच्या कार्यालयात काम करणाऱ्या एका ऑफिस बॉयने १२ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आरोपी ऑफिस बॉयला अटक करण्यात आली असून त्याच्यावर बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार (पॉक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास दिलीप गायकवाड (वय ३५, मूळ रा. हराळवाडी, सोलापूर) असे आरोपी ऑफिस बॉयचे नाव आहे. याप्रकरणी ४५ वर्षीय व्यक्तीने मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींचा मुलगा इयत्ता ८ वीमध्ये शिकत असून तो खासगी शिकवणीसाठी मार्केट यार्ड भागातील एका क्लासमध्ये जात होता. गेल्या चार-पाच दिवसापूर्वी रात्री साडे दहाच्या सुमारास जेवण झाल्यानंतर तो वडिलांना म्हणाला मी उद्या शाळेत जाणार नाही. वडील त्याला म्हणाले, तू अनेकदा सुट्टी मारतो. तुला शाळेत जायला हवे. त्यावेळी मुलगा रडायला लागला. वडिलांनी विश्वासात घेऊन त्याला विचारले असता, त्याने विकासच्या कृत्याची माहिती दिली.विकास हा डिसेंबर २०२५ पासून मुलावर लैंगिक अत्याचार करत होता. एवढेच नव्हे, तर आरोपीने मुलाचे फोटो काढून त्याला मानसिक त्रास दिला. त्यानंतर वडिलांनी क्लासमध्ये जाऊन महिती घेतल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी गायकवाड याला अटक केली असून, याप्रकरणाचा पुढील तपास मार्केट यार्ड पोलिस करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Tuition Class Horror: Office Boy Abuses Student, Films Act

Web Summary : In Pune, an office boy sexually abused a 12-year-old tuition student and filmed the act. Police arrested Vikas Gaikwad following the boy's disclosure to his father about ongoing abuse since December 2023. The accused also mentally harassed the victim with photos. A POSCO case has been registered.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्रPune Crimeपुणे क्राईम बातम्या