शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय सुडबुद्धीतून आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल,अब्रुनुकसानीचा दावा करणार : संजय काकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2020 13:28 IST

संजय काकडे यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याची युवराज ढमाले यांची पोलिस ठाण्यात तक्रार

ठळक मुद्देचतु:श्रृंगी पोलिसांनी संजय काकडे दाम्पत्यांवर गुन्हा दाखल

पुणे : दुर्दैवाने माझ्या मेव्हण्याने तक्रार दिली आणि माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. राजकीय सुडबुद्धीतून आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्यामागे कोणाकोणाचा सहभाग आहे, याची शहानिशा करणार असल्याचे भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार संजय काकडे यांनी सांगितले. काकडे यांचे मेव्हणे युवराज ढमाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चतु:श्रृंगी पोलिसांनीसंजय काकडे दाम्पत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात ढमाले यांनी आपल्याला जीव मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. याविषयी बोलताना संजय काकडे यांनी सांगितले की, आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती मला पत्रकारांकडून समजली. दुदैवाने माझ्याच मेव्हण्याने फिर्याद दिली आहे. दोन वर्षांपूर्वी आमच्या घरात मी धमकी दिली असे त्यांचे म्हणणे आहे. हे राजकीय षडयंत्र असून मी संबंधितांवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे. वास्तविक दोन वर्षांपूर्वी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी युवराज ढमाले पुष्पगुच्छ घेऊन आले असताना भेट झालेली आहे. याव्यतिरिक्त आजपर्यंत गेल्या दोन वर्षात त्यांच्याबरोबर माझे बोलणे झालेले नाही. ज्यांनी तक्रार दिली, त्यांनी घेतली त्यांचे फोन चेक करा. जोपर्यंत ही एफआयआर रद्द होत नाही, तोपर्यंत अगदी दिल्लीपर्यंत जाऊन आपण याची शहानिशा करणार आहोत. कोर्टाच्या माध्यमातून याची चौकशी व्हावी, माझ्या वकिलांनीही सांगितले की, तुमचे म्हणणे न मांडता पोलीस एफआयआर दाखल करतात. राज्य घटनेनुसार कोणाविरुद्ध तक्रार आली तर त्याची चौकशी करावी. त्यानंतर त्यात तथ्य आढळल्यावर गुन्हा दाखल करावा. आतापर्यंत आपल्याला पोलिसांकडून काहीही कळविण्यात आलेले नाही. त्यामुळे एका माजी खासदाराला त्याचे म्हणणे मांडू न देता, पोलीस गुन्हा दाखल करतात. हे चुकीचे आहे. राजकीय सुडबुद्धी, आर्थिक चणचण आणि माझी झालेली राजकीय प्रगती यामुळे कोणीतरी हाताशी धरुन हा गुन्हा दाखल केला आहे. त्यात जे जे सहभागी आहे, त्यांना शिक्षा मिळेपर्यंत मी गप्प बसणार नाही, असे काकडे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेSanjay Kakdeसंजय काकडेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस