फसवणूक करणाऱ्या बिल्डरवर गुन्हा

By Admin | Updated: January 10, 2017 03:40 IST2017-01-10T03:40:47+5:302017-01-10T03:40:47+5:30

फ्लॅटची कागदपत्रे, ताबा किंवा बुकिंग अमाउंट परत न देता टाळाटाळ करून फसवणूक केल्याप्रकरणी वाघोली येथील

Crime on the Cheating Builder | फसवणूक करणाऱ्या बिल्डरवर गुन्हा

फसवणूक करणाऱ्या बिल्डरवर गुन्हा

वाघोली : फ्लॅटची कागदपत्रे, ताबा किंवा बुकिंग अमाउंट परत न देता टाळाटाळ करून फसवणूक केल्याप्रकरणी वाघोली येथील अथर्व होम्सचे मालक व मॅनेजर यांच्यावर लोणी कंद पोलीस ठाण्यात फसवणूक व मोफाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरटीआय कार्यकर्ते श्रीजीत रमेशन यांनी दोघांविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली आहे.
मालक हेमानकुमार आशर (कॅम्प, पुणे) व मॅनेजर निखिल सूर्यवंशी (वाघोली) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीजीत रमेशन यांनी सप्टेंबर महिन्यामध्ये वाघोली येथील गट क्रमांक ६६१ मध्ये अंबा ग्रुपतर्फे करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार चौकशी केली असता मॅनेजर निखिल सूर्यवंशी यांनी सर्व कागदपत्रे देण्याचे आश्वासन दिले. यानंतर रमेशन यांनी २५ हजारांचा चेक दिला. सहा दिवसांनंतर पुन्हा त्याच ठिकाणी जाऊन चौकशी केली असता आणखी १ लाख ७५ हजार रुपयांची मागणी निखिल सूर्यवंशी यांनी करून चेक पास झाल्यानंतर कागदपत्रे देण्याचे सांगितले. चेक दिल्यानंतर काही दिवसांनी कागदपत्रांची मागणी केली असता सूर्यवंशी यांच्याकडून टाळाटाळ करण्यात आली. पुढील तपास लोणी कंद पोलीस करीत आहे. (वार्ताहर)

Web Title: Crime on the Cheating Builder