शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवड शहरातील १३५ नागरिकांवर खटले दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 00:01 IST

लॉकडाऊन शिथील करण्यात आला असला तरी जमावबंदीसह काही निर्बंध कायम आहेत.

ठळक मुद्देदारुबंदी कायद्यांतर्गत देखील शुक्रवारी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी १५ गुन्हे केले दाखल

पिंपरी : लॉकडाऊन शिथील झाले असले तरी जमावबंदीसह काही निर्बंध कायम आहेत. मात्र शहरातील काही नागरिक त्याकडे दुर्लक्ष करून आदेशाचे उल्लंघन करतात. अशा १३५ नागरिकांवर पोलिसांनी शुक्रवारी (दि. २१) भारतीय दंड विधान कलम १८८ अन्वये खटले दाखल केले. 

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. त्यातच मृतांचा आकडाही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच लॉकडाऊन शिथील करण्यात आला असला तरी जमावबंदीसह काही निर्बंध कायम आहेत. त्याचे पालन करावे, असे आवाहन प्रशासन व पोलिसांकडून केले जात आहे. मात्र तरीही काही नागरिक त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. अशा नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी भादवि कलम १८८ अन्वये बुधवारी एमआयडीसी भोसरी (२२), भोसरी (९), पिंपरी (१३), चिंचवड (१०), निगडी (११), आळंदी (८), चाकण (२), दिघी (८), सांगवी (३), वाकड (६), हिंजवडी (७), तळेगाव दाभाडे (५), चिखली (२७), शिरगाव चौकी (४) या पोलीस ठाण्यांतर्गत १३५ नागरिकांवर खटले दाखल केले.दारुबंदीचे १५ गुन्हे दाखलदारुबंदी कायद्यांतर्गत देखील शुक्रवारी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी १५ गुन्हे दाखल केले. एमआयडीसी भोसरी (२), भोसरी (१), पिंपरी (२), निगडी (२), चाकण (५), सांगवी (१), हिंजवडी (१), तळेगाव एमआयडीसी (१) या पोलीस ठाण्यांतर्गत कारवाई झाली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कारवाई केली जात आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या