शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या सराईत गुन्हेगारावर गुन्हा

By नितीश गोवंडे | Updated: March 30, 2024 16:37 IST

हा प्रकार फेब्रुवारी २०२२ ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत आरोपीच्या घरी व कात्रज येथे मित्राच्या घरात घडला आहे....

पुणे : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून मित्राच्या घरी बोलवून तिच्यावर वारंवार शारीरिक संबंध  ठेवले. यातून पीडित मुलगी नुकतीच प्रसुत झाली असून तिने एका मुलाला जन्म दिला. यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी सराईत गुन्हेगार असून सध्या तो नाशिक मध्यवर्ती कारागृहात एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेत आहे. हा प्रकार फेब्रुवारी २०२२ ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत आरोपीच्या घरी व कात्रज येथे मित्राच्या घरात घडला आहे.

याबाबत १४ वर्षीय पीडित मुलीने शुक्रवारी (दि. २९) भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून सागर संदीप शर्मा (रा. एसआरए वसाहत, भारती विद्यापीठ, पुणे) याच्यावर बलात्कारासह पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित तरुणीची दोन वर्षापूर्वी ओळख झाली. आरोपीने मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आमिष दाखवले. तिला स्वत:च्या आणि कात्रज येथील मित्राच्या घरी वारंवार बोलावून घेत तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून पीडित मुलगी गरोदर राहिली. तिने २७ मार्च रोजी संध्याकाळी एका बाळाला जन्म दिला.

पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन सागर शर्मा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक भाबड करत आहेत. आरोपी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. तत्कालीन पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी डिसेंबर २०२३ मध्ये सागर वर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करुन एक वर्षासाठी नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे. सागर शर्मा विरोधात गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे दाखल असून त्याच्या दहशतीमुळे नागरिक तक्रार देत नव्हते.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी