शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘सोवळे मोडले’ म्हणून स्वयंपाकी महिलेवर गुन्हा, पुरोगामी पुण्यातील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 11:28 IST

पुरोगामी पुण्यात जातीअंताच्या लढाईची चळवळ सुरू असताना घरकामासाठी आलेल्या बाईवर जात लपवून ‘सोवळे मोडले’ म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लक्ष्मण मोरेपुणे, दि. 7 - पुरोगामी पुण्यात जातीअंताच्या लढाईची चळवळ सुरू असताना घरकामासाठी आलेल्या बाईवर जात लपवून ‘सोवळे मोडले’ म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे हवामान विभागाच्या माजी संचालिका असलेल्या डॉ. मेधा खोले यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.डॉ.  खोले यांच्या घरी दरवर्षी गौरी गणपती बसतात. घरी आई-वडिलांचे श्राद्ध विधीही असतात. त्यासाठी त्यांना  ‘सोवळ्यातील’ स्वयंपाक करणारी सुवासिनी असलेली ब्राह्मण स्त्री हवी होती. 2016 मध्ये मे महिन्यात त्यांच्याकडे निर्मला कुलकर्णी नावाची एक स्त्री आली होती. देवाच्या कार्यक्रमाचे स्वयंपाक करते असे सांगितले होते. तिच्या माहितीवरुन खोले यांनी प्रत्यक्ष धायरी येथील तिच्या घरी जाऊन चौकशी करून त्या ब्राह्मण आहेत की नाही याची खात्री केली. त्यानंतर लगेचच निर्मला यांना घरच्या धार्मिक कार्याच्या स्वयंपाकासाठी बोलावले.मे 2016 मध्ये वडिलांच्या श्राद्धाच्या वेळी तसेच सप्टेंबर महिन्यात गौरी गणपती आणि आईच्या श्राद्धाच्यावेळी तसेच 2017 मध्ये वडीलांच्या श्राद्धासह गौरी गणपती आणि आईच्या श्राद्धाच्यावेळी सोवळ्यातील नैवेद्याचा स्वयंपाक केला होता. दोन वर्षात त्यांनी एकूण सहा वेळा स्वयंपाक केला. बुधवारी निर्मला या ब्राह्मण नसून मराठा असल्याचे खोले यांच्या गुरुजींनी त्यांना सांगितले. याबाबत खोले यांनी पुन्हा निर्मला यांच्या घरी जाऊन चौकशी केली. त्यावेळी निर्मला यांनी त्यांचे नाव निर्मला यादव असल्याचे सांगितले. त्यावेळी निर्मला यांना त्यांनी कुलकर्णी असे खोटे नाव का सांगितले,  आमच्या घरी केवळा ब्राह्मण समाजातील सुवासिनी बाईने केलेलाच स्वयंपाक चालतो अशी विचारणा केली. यावरून निर्मला यांनी दमदाटी आणि शिवीगाळही केल्याची फिर्याद डॉ. खोले यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात दिली आहे.

 या प्रकाराची नेमकी तक्रार कशी दाखल करुन घ्यावी असा प्रश्न पोलिसांना पडला होता. तक्रार करू नये यासाठी वरिष्ठ पोलीस अधिका-यांकडून तसेच समाजातील मान्यवरांकडून डॉ. खोले यांची समजूत घातली जात होती. मात्र, फिर्याद दाखल करून घेण्यावर त्या ठाम राहिल्या. त्यामुळे पोलिसांना भारतीय दंडविधान संहिता कलम ४१९ (फसवणूक), कलम ३५२ (हल्ला करणे) आणि कलम ५०४ (धमकी) अन्वये गुन्हा दाखल करून घ्यावा लागला.

खोले यांच्याविरोधातही गुन्हा दाखल

जात लपवून स्वयंपाकाचे काम मिळवल्याप्रकरणी वयस्कर महिलेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेल्या डॉ. मेधा खोले यांच्याविरुद्धही याप्रकरणी संबंधित महिलेने मारहाणीचा तसेच धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे. निर्मला दत्तात्रय यादव (वय 80, रा. समर्थ अपार्टमेंट, रायकर मळा, धायरी) यांनी फिर्याद दिली आहे.यादव या खोले यांच्याकडे स्वयंपाकाचे काम करीत होत्या. या कामाचे पैसे त्यांनी दिले नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. खोले यांनी गुरुवारी त्यांच्या घरी जाऊन तुम्ही मला निर्मला दत्तात्रय कुलकर्णी असल्याचे खोटे का सांगितले असे विचारले. तेव्हा यादव यांनी माझे खरे नावच मी तुम्हाला सांगितले होते असे सांगत असतानाच खोले यांनी शिवीगाळ करीत हाताने मारहाण करायला सुरुवात केली. तसेच बघून घेण्याची धमकी दिली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी मारहाणीचा व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ----------खोले यांच्याकडे मला जोशी नावाच्या गुरुजींनी काम मिळवून दिले होते. मी त्यांना कधीही आपण ब्राह्मण असल्याचे सांगितले नाही. जोशी यांनीच खोलेंना त्यांना तसे खोटे सांगितले असावे. मला खोलेंनी कधी जात विचारली नाही आणि मी ही कधी सांगितली नाही. जोशी आणि माझ्यामध्ये वाद झाल्याने त्याने जाऊन खोलेंना मी ब्राह्मण नसून मराठा असल्याचे सांगितले. त्यानंतर वादाला सुरुवात झाली आहे. खोले यांनी केलेल्या गैरवर्तनाबद्दल मी पोलिसात तक्रार दिली आहे. - निर्मला दत्तात्रय यादव

टॅग्स :HinduismहिंदुइझमPoliceपोलिसPuneपुणे