महिलेशी अनैतिक संंबंध!, शहर कॉँग्रेसच्या सरचिटणिसावर गुन्हा, पतीचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 12:51 IST2017-10-16T12:50:35+5:302017-10-16T12:51:07+5:30
एका महिलेच्या पतीला आत्महत्येचा प्रयत्न करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पुणे शहर काँग्रेसचे सरचिटणीस विनय ढेरे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

महिलेशी अनैतिक संंबंध!, शहर कॉँग्रेसच्या सरचिटणिसावर गुन्हा, पतीचा आत्महत्येचा प्रयत्न
पुणे : एका महिलेच्या पतीला आत्महत्येचा प्रयत्न करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पुणे शहर काँग्रेसचे सरचिटणीस विनय ढेरे यांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी महिलेलाही ताब्यता घेतले आहे. अनैतिक संबंधांतून हा प्रकार घडला.
खडक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनय ढेरे यांचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. या दोघांच्या वर्तणुकीचा या महिलेचा पती आणि त्यांच्या मुलींना त्रास होत होता. यावरून दोघांमध्ये सतत भांडणेही होत असत. याला कंटाळून जाऊन या महिलेच्या पतीने आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने तो बचावला. पोलिसांनी सोमवारी सकाळी विनय ढेरे याला अटक केली आहे. संबंधित महिलेलाही ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान संहिता ५०६ आणि ५११ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.