शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Crime: प्रसिद्ध महाविद्यालयातील तरुणीवर चोरीचा आळ घेत मित्र-मैत्रिणींनीच कपडे उतरवले, ५ जणांवर गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 10:03 IST

Crime News: पुण्यातील प्रसिद्ध महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर चोरीचा आळ घेऊन तिच्याच मित्र आणि मैत्रिणींनी तिचे कपडे उतरवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

- किरण शिंदे

पुणे-  पुण्यातील प्रसिद्ध महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर चोरीचा आळ घेऊन तिच्याच मित्र आणि मैत्रिणींनी तिचे कपडे उतरवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींनी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडून 80 हजार रुपये जबरदस्तीने घेतले. लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वाघोलीत 17 ऑक्टोबर रोजी ही घटना घडली. याप्रकरणी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये तीन तरुणींसह पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पीडित मुलीच्या आईने तक्रार दिली आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित मुलगी ही हरियाणा राज्यातील मोडियाखेडा गावची रहिवाशी आहे. वाघोली येथील लेक्सिकॉन मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये ती शिक्षण घेत होती. तर आरोपी देखील त्याच इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेतात. एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याने पीडित तरुणी आणि आरोपींपैकी दोन तरुणी या वाघोली येथील फ्लॅटमध्ये राहण्यासाठी होत्या. त्यांच्या रूममध्ये चोरी झाली होती. पीडित मुलीला घरमालकावर संशय असल्याने तिने रूम बदलली आणि दुसऱ्या मुलींसोबत राहण्यासाठी गेली.

दरम्यान दुसऱ्या रूममध्ये राहत असताना आरोपी त्या फ्लॅटमध्ये गेले आणि त्यांनी पीडित तरुणीला शिवीगाळ करत चोरी केल्याचा आरोप केला. लॅपटॉप आणि सोन्याची चैन तू चोरली असे बोलून एका खोलीत घेऊन जात तिचे कपडे काढून झडती घेतली. याबद्दल कुणाला काही सांगितल्यास व्हिडिओ बनवून व्हायरल करण्याची धमकीही दिली. तर तिच्या विरोधात पोलिसात तक्रार देण्याची धमकी देऊन तिच्याकडून 80 हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतले.

आणखी पैशाच्या मागणी करत आरोपी तरुण तरुणींनी तिला हाताने मारण्यास सुरुवात केली होती. परंतु पीडित तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूचे लोक त्या ठिकाणी आले आणि त्यानंतर आरोपी पळून गेले. या सर्व प्रकाराने घाबरलेली तरुणी आपल्या मूळ गावी गेली होती. तिथे गेल्यानंतर या तरुणीच्या आईने हरियाणा राज्यातील सिरसा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. ही तक्रार लोणीकंद पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणेcollegeमहाविद्यालय