मास्क न लावल्याने क्रिकेटपटू राहुल त्रिपाठीला दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:10 IST2021-05-29T04:10:32+5:302021-05-29T04:10:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कायदा आणि नियम हे सर्वांसाठी समान असल्याचे पोलिसांनी एका क्रिकेटरला दाखवून दिले. मास्क न ...

मास्क न लावल्याने क्रिकेटपटू राहुल त्रिपाठीला दंड
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कायदा आणि नियम हे सर्वांसाठी समान असल्याचे पोलिसांनी एका क्रिकेटरला दाखवून दिले. मास्क न लावल्यामुळे ‘आयपीएल स्टार’ राहुल त्रिपाठीकडून पाचशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्रिपाठीनेही कोणतेही आढेवेढे न घेता चूक मान्य करुन तातडीने दंड भरला.
राहुल आयपीएल क्रिकेटमधील कोलकाता नाईट रायडर्स संघातील सलामीवीर आहे. तो खडकी भागात राहायला असून, त्याचे वडील लष्करी अधिकारी आहेत. शुक्रवारी ( दि.२८) तो कोंढव्यातील खडीमशीन चौकातून निघाला होता. नाकाबंदी सुरू असताना पोलिसांनी कारची तपासणी केली. कार मधील एकानेही मास्क लावले नव्हते.
पोलिसांनी मोटारीची काच खाली घेण्यास सांगितले. तेव्हा कारमधील व्यक्ती क्रिकेटपटू राहुल त्रिपाठी असल्याचे समजले. त्रिपाठीने नियमानुसार पाचशे रुपये दंड भरला आणि चूक मान्य केली. त्याला दंडात्मक कारवाईची पावती दिली असल्याचे कोंढवा पोलिसांनी सांगितले.
---