शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

Cyber Crime : पुण्यातील नागरिकाच्या नावानं दिल्लीत काढलं क्रेडिट कार्ड; तब्ब्ल ७ लाखांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 21:22 IST

११ पैकी सायबर पोलिसांनी हस्तगत केले ६ महागडे मोबाईल

पुणे : पुण्यातील नागरिकाच्या नावाने दिल्लीत क्रेडिट कार्ड घेऊन त्यावरुन ११ महागडे मोबाईल खरेदी करुन फसवणूक केली. ते मोबाईल सायबर चोरट्याने पुन्हा दुसऱ्याला विकले. २०१९ मधील या सायबर गुन्ह्यातील २ लाख ४० हजार रुपयांचे ६ मोबाईल सायबर पोलिसांनी दिल्लीतून हस्तगत केले आहेत.

पुण्यातील नागरिकाला मोबाईल कॉल आला होता बँकेतून बोलत असल्याची बतावणी करुन ५ हजार रुपयांचे ई व्हाऊचर ॲक्टीव्हेट करण्याच्या बहाण्याने त्यांच्या क्रेडिट कार्डची माहिती करुन घेतली. त्यानंतर या सायबर चोरट्याने या माहितीच्या आधारे नवी क्रेडीट कार्ड हस्तगत केले. या क्रेडिट कार्डच्या आधारे त्याने नवी दिल्लीतून नव प्लस, आय फोन कंपनीचे महागडे ११ मोबाईल खरेदी करुन पुण्यातील नागरिकाची ७ लाख २ हजार ४३९ रुपयांची फसवणूक केली. लॉकडाऊन सुरु होण्यापूर्वी हा प्रकार घडला होता.

जेव्हा क्रेडिट कार्डचे बिल पुण्यातील नागरिकाला आले. तेव्हा हा फसवणुकीचा प्रकार समोर आला होता. सायबर पोलिसांकडे याची तक्रार आल्यावर पोलिसांनी ज्या क्रेडिट कार्डवरुन हे मोबाईल खरेदी केले गेले. त्या मोबाईलची माहिती घेतली. त्यानंतर हे मोबाईल कोणाकडे आहेत, याची माहिती घेतल्यावर या सायबर चोरट्याने हे मोबाईल दुसर्यांना वेगवेगळी कारणे सांगून विकले. क्रेडिट कार्डवरुन खरेदी केली असल्याचे मोबाईल खरेदी केल्याची पावती या चोरट्याकडे होती. त्यामुळे ग्राहकांना हे महागडे फोन खरेदी करण्यास वावगे वाटले नाही. पुणे पोलिसांनी जेव्हा या दिल्लीतील मोबाईल धारकांशी संपर्क साधला. तेव्हा त्यांना धक्काच बसला. पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी एस हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, पोलीस अंमलदार सचिन वाझे, नितेश शेलार, निलेश लांडगे, माधुरी डोके यांनी ही कामगिरी केली.

याबाबत पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांनी सांगितले की, क्रेडिट कार्डवरुन खरेदी केलेल्या ११ महागड्या मोबाईलपैकी ६ मोबाईल दिल्लीतून हस्तगत करण्यात यश आले असून लवकरच हा सायबर चोरट्यापर्यंत आम्ही पोहचू.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकcyber crimeसायबर क्राइम