-वाघोली, मुंढवा, हडपसर, खराडी, धानोरी, लोहगाव या ईशान्य पुण्यातल्या घरांची विक्रीही जानेवारी- जुलै २०१९ मध्ये ३ हजार ५५१ कोटी रुपये, २०२० मध्ये २ हजार १५१ कोटी रुपये तर जानेवारी-जुलै २०२१ मध्ये ५ हजार १७४ कोटी रुपये होती.
-नैर्ऋत्य पुणे अर्थात बावधन, धायरी, कोथरूड, आंबेगाव बुद्रुक, नांदेड भागात जानेवारी-जुलै २०१९ मध्ये घरांची विक्री ही ३ हजार ५४० कोटी रुपये होती. २०२० मध्ये ही विक्री १ हजार ५९३ कोटी तर २०२१ मध्ये ४ हजार १३६ कोटी रुपये झाली.
-उंड्री, कोंढवा, महम्मदवाडी, फुरसुंगी, कोंढवा बुद्रुक, येवलेवाडी या आग्नेय पुण्याच्या भागात जानेवारी-जुलै २०१९ मध्ये घरांची विक्री ३ हजार ६९ कोटी रुपये झाली. २०२० मध्ये याच भागातील घरांची विक्री १ हजार ५५९ कोटी, तर २०२१ मध्ये ३ हजार ७३८ कोटी रुपये होती.
-मध्य पुण्यात २०१९ मध्ये ७२३ कोटी रुपयांची विक्री झाली. जानेवारी-जुलै २०२० मध्ये ही विक्री ४७४ कोटी रुपये, तर २०२१ मध्ये ९०२ कोटी रुपये झाली. पिंपरी भागात २०१९ मध्ये ५ हजार २१८ कोटी रुपये, २०२० मध्ये २ हजार ८६१ कोटी रुपये, तर जानेवारी- जुलै २०२१ मध्ये ६ हजार ४४७ कोटी रुपये इतक्या किमतीच्या घरांची विक्री झाली.
फोटो ओळ - क्रेडाई पुणे मेट्रोच्या ३८ व्या सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित (डावीकडून) आय. पी. इनामदार, डॉ. डी. जी. अभ्यंकर, अतुल गाडगीळ, अमर मांजरेकर, अनिल फरांदे, डॉ. ब्रिजेश दीक्षित, अरविंद जैन, दिलीप मित्तल आणि कपिल गांधी.