शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

राष्ट्रशक्तीसाठी युवकांना घडवावे - डॉ. दत्तात्रय शेकटकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 01:59 IST

भारत युवा पिढीचे सर्वाधिक प्रमाण असणारे राष्ट्र आहे. राष्ट्रशक्ती प्रबळ करण्यासाठी युवकांचे खंबीर कवच असणे आवश्यक आहे. राष्ट्राची शक्ती वाढवण्यासाठी भूदल, नौदल वायूदल, सतत कार्यरत असतात.

पुणे  - भारत युवा पिढीचे सर्वाधिक प्रमाण असणारे राष्ट्र आहे. राष्ट्रशक्ती प्रबळ करण्यासाठी युवकांचे खंबीर कवच असणे आवश्यक आहे. राष्ट्राची शक्ती वाढवण्यासाठी भूदल, नौदल वायूदल, सतत कार्यरत असतात. सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटसारख्या संस्था युवकांना घडवण्याचे काम करतात. त्यांनी राष्ट्राच्या शक्तीसाठी युवकांना घडवावे, असे मत निवृत्त लेफ्टनंट जनरल डॉ. दत्तात्रय शेकटकर यांनी व्यक्त केले.सूर्यदत्ता एज्युकेशन फाऊंडेशनच्या सूर्यदत्ता ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटतर्फे आयोजित सूर्यदत्ता जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. विद्यावाचस्पती पंडित डॉ. शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते झाले. यंदा पुरस्कारांचे १७ वे वर्ष होते. बावधन येथील सूर्यदत्ता ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटच्या कॅम्पसमध्ये झालेल्या या सोहळ्याला प्रसिद्ध कवी शैलेश लोढा, ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, अभिनेता रझा मुराद, सूर्यदत्ता ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, डॉ. विनोद शहा आदी उपस्थित होते.ग्रॅमी पुरस्कारप्राप्त पद्मभूषण विश्वमोहन भट्ट (भारतीय शास्त्रीय प्रदर्शन कला), ज्ञानेश्वर मुळ्ये (प्रशासकीय सेवा), हुकमीचंद चोरडिया (ग्लोबल आंत्रेप्रेन्युअरशिप), पद्मश्री तालयोगी पंडित सुरेश तळवलकर (भारतीय शास्त्रीय संगीत), डॉ. अरविंद नातू (विज्ञान-तंत्रज्ञान), रमणलाल शहा (ज्योतिषशास्त्र), शक्ती कपूर (चित्रपट व कला), असितकुमार मोदी (निर्मिती-दिग्दर्शन), फारुक मास्टर (वैद्यकीय सामाजिक सेवा), शाम अगरवाल (पत्रकारिता) यांना ‘सूर्यदत्ता जीवनगौरव पुरस्कार,’ तर पद्मश्री मिलिंद कांबळे (औद्योगिक सामाजिक सेवा), रितू प्रकाश छाब्रिया (कॉपोर्रेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी), विष्णू मनोहर (हॉस्पिटालिटी मॅनेजमेंट), डॉ. अर्चिका सुधांशू (अध्यात्म), संदीप गादिया (सायबर सुरक्षा), विजय भंडारी (सामाजिक उद्योगता व मानवता), मनीष पॉल (मनोरंजन), सुरी शांदिया (बँकिंग अ‍ॅँड फायनान्स), डॉ. शैलेश गुजर (माध्यम व जनसंपर्क), बीके सुजाथाबेन राठी (वैद्यकीय संशोधन), निवेदिता साबू (फॅशन डिझाईन), मानसी गुलाठी (आरोग्य), विपुल कासार (स्टार्टअप व इनोव्हेशन), अंकिता श्रॉफ (महिला उद्योजक) यांना सूर्यदत्ता राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.विश्वमोहन भट, सुरेश तळवलकर, श्याम अगरवाल, विश्वेश कुलकर्णी, डॉ. फारुक मास्टर, विष्णू मनोहर, विजय भंडारी, निवेदिता साबू, मनीष पॉल, रझा मुराद, उल्हासदादा पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. सुनील धनगर व नूपुर पिट्टी, डॉ. किमया गांधी, स्नेहल नवलखा यांनी सूत्रसंचालन केले. सुषमा चोरडिया यांनी आभार मानले.ज्ञानेश्वर मुळ्ये म्हणाले, की प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर आता नव्या भूमिकेसाठी इच्छुक आहे. नोकरीच्या कार्यकाळात पासपोर्टचा चेहरा बदलला. आता लोकसेवक होऊन देशाचा चेहरामोहरा बदलण्याची इच्छा आहे. समाजातील दुजाभाव, भेद संपविण्यासाठी मला काम करायचे आहे. त्यासाठी मला आपली सोबत हवी असून, ती मिळाल्यास मी कुठेही कमी पडणार नाही.हुकमीचंद चोरडिया म्हणाले, की प्रवीण व सुहाना मसाल्याच्या उत्पादनांत दर्जा आणि ग्राहकाभिमुख सेवा दिल्यानेच यश मिळाले. आजच्या तरुणांत प्रचंड उत्साह आहे. यश-अपयशात कार्याचे मोजमाप नसते. आपल्या कामातील सातत्य आणि निष्ठा हेच आपल्याला यशाकडे नेतात.

टॅग्स :Puneपुणे