शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

प्लॅस्टर आॅफ पॅरिसचा अन्नसाखळीला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 01:29 IST

प्लॅस्टर आॅफ पॅरिसचा मानवी अन्नसाखळीत शिरकाव होऊ लागल्याने भविष्यात घरोघरी कर्करोगाचे रुग्ण असतील अशी भीती पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे;

- रविकिरण सासवडे बारामती : प्लॅस्टर आॅफ पॅरिसचा मानवी अन्नसाखळीत शिरकाव होऊ लागल्याने भविष्यात घरोघरी कर्करोगाचे रुग्ण असतील अशी भीती पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे; मात्र मातीच्या मूर्तींच्या किमती जास्त असल्याने ग्राहक मातीच्या मूर्ती घेण्यासाठी धजावत नसल्याचेही चित्र आहे. तसेच, मातीच्या मूर्ती तयार करण्यासाठी मूर्तीकारांना भरपूर वेळ द्यावा लागत असल्याने, मातीच्या मूर्ती मागणीनुसारच तयार करून देण्यात येत आहेत.अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने मूर्ती कारखान्यांमध्ये गणेश मूर्तींवर अखेरचा हात फिरवण्यासाठी कलाकारांची धांदल उडाली आहे. यंदादेखील पर्यावरण पूरक मूर्ती मागणीनुसार तयार करून देण्यात येत आहेत; मात्र शाडूमातीची एक मूर्ती तयार करण्यासाठी दोनतीन दिवसांचा वेळ द्यावा लागत असल्याने या मूर्तींची किमतही जास्त आहेत. सण-उत्सवांच्या काळात पर्यावरणाची काळजी घ्यावी, यासाठी शासनस्तरावरून आवाहन करण्यात येते. तसेच शाळा-महाविद्यालयांमधून स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून गणेशोत्सवासाठी पर्यावरणपूरक मूर्ती बनविण्याच्या कार्यशाळा घेतल्या जातात. यामध्ये प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीपासून पर्यावरणाची होत असलेली हानी अधोरेखीत करण्यात येते.यासंदर्भात, जनजागृती मोठ्याप्रमाणात होत आहे. ठिकठिकाणी पर्यावरण पूरक शाडूमातीच्या मूर्तीचे स्टॉलदेखील सजत आहेत. मात्र, या मूर्ती बनविण्यासाठी कलाकारांना वेळ द्यावा लागत आहे.> प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती पर्यावरणाच्या दृष्टीने धोकादायक आहेत. मूर्तीकारांनीही जास्तीत जास्त शाडूमातीच्या मूर्ती बनविण्याची गरज आहे. अनेक मूर्तीकारांना शाडूमाती विकत घ्यावी लागते. ५० किलो मातीच्या पोत्यासाठी ४०० रुपये मोजावे लागतात. यामध्ये सरासरी ६ इंचाच्या २० व एका फुटाच्या ८ मूर्ती तयार होतात. किमती जास्त असल्या, तरी पर्यावरणाचे संवर्धन राखण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. या जबाबदारीचे भान ग्राहकानेदेखील ठेवले पाहिजे. किंमत जास्त असली, तरी ग्राहकांनी त्या मूर्ती खरेदी केल्या तरच पर्यावरण संवर्धनाला हातभार लागणार आहे.- दिलीप डेंगळे, अध्यक्ष, बारामती तालुका कुंभार समाज संघटना>प्लॅस्टर आॅफ पॅरिस हे एक प्रकारचे सिमेंट आहे. उत्सवानंतर या मूर्ती पाणवठ्यांमध्ये विसर्जित केल्या जातात. हेच पाणी पिण्यासाठी वापरले जाते. कोणत्याही प्रदूषणाचा प्रथम प्रभाव हा सूक्ष्मजीवांवर होतो.हे सूक्ष्मजीव मारले जातात.मानवाच्या अन्नसाखळीमध्ये पुढील काही वर्षांत प्लॅस्टर आॅफ पॅरिस जाणार आहे. वेगवेगळ्या रसायनांच्या माध्यमातून तयार झालेले प्लॅस्टर आॅफ पॅरिसमुळे मानवाला कॅन्सरसारख्या भयानक रोगाला सामोरे जावे लागेल. पर्यावरण संवर्धनाची गरज लक्षात घेऊन प्रत्येकांनी आपापली जबाबदारी ओळखली पाहिजे.- डॉ. महेश गायकवाड,पर्यावरणतज्ज्ञ>कोणत्याही साच्याविना या मूर्तींची कलाकुसर घडवावी लागत आहे. त्यामुळे साहजिकच या मूर्तींच्या किंमती वाढतात. सध्या बाजारात शाडूमातीच्या एक फुटाच्या गणेश मूर्तीची किंमत १ हजाराच्या पुढे आहे. प्लॅस्टर आॅफ पॅरिसपासून १०० मूर्ती बनविण्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळात शाडूमातीच्या केवळ १० मूर्ती बनवून तयार होतात. व्यवसायाची गणिते जमवताना शाडूमातीच्या मूर्तींच्या किंमती वाढतात.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवNatureनिसर्ग