शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

ऐकावे ते नवलच; वाल्ह्यात गाईचे डोहाळजेवण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 00:45 IST

ग्रामीण भागात विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. मग तो वाढदिवस असो, कुठला सण असो वा अन्य कुठला कार्यक्रम.

वाल्हे  - ग्रामीण भागात विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. मग तो वाढदिवस असो, कुठला सण असो वा अन्य कुठला कार्यक्रम. अशा कार्यक्रमांसाठी प्रत्येक जण हा नेहमीच उत्साही असतो. परंतु, अशाच कार्यक्रमांचा आधार घेऊन त्या गावात चक्क देशी गाईचे डोहाळजेवण घालण्यात आल्याने या जेवणाची जोरदार चर्चा पुरंदर तालुक्यात चांगलीच रंगली आहे.पुणे जिल्ह्याच्या सीमेवर वीर धरणाच्या पलीकडे असणाऱ्या भादे गावात तानाजी शंकर चव्हाण व अनिता या शेतकरी दाम्पत्याने एका देशी गाईचा पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळ केला आहे.त्यांनी तिचे नाव राधिका असे ठेवले आहे. आता या राधिकेच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याची बातमी कळताच या दाम्पत्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.त्यामुळे त्यांनी तिचे डोहाळजेवण करायचे ठरविले.या अनोख्या कार्यक्रमाला सीझन वर्ल्ड उद्योगसमूहाचे संस्थापक योगेश कदम, भादे गावाच्या सरपंच मंगल साळुंखे, अण्णा कबुले, कल्पना चव्हाण, राख गावचे कैलास पवार, प्रशांत साळुंखे, सोनाली चव्हाण, लीलावती कदम, सुनीता शिंदे, रंजना चव्हाण, अहिल्या हिंगे, नीलिमा चव्हाण, लक्ष्मी शेलार, रूपाली पवार, कमोदिनी साळुंखे, जया चव्हाण यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येनेउपस्थित होत्या.ग्रामस्थांच्या मदतीने प्रतीकात्मक ओटीमुलीप्रमाणे सांभाळ केलेल्या राधिका गाईला वस्त्रालंकार व फुलांच्या हारांनी सजवून या दाम्पत्याने महिला व ग्रामस्थांच्या मदतीने तिची प्रतीकात्मक ओटीदेखील भरली.या वेळी महिलांनीदेखील डोहाळजेवणानिमित्त सदाबहार गाणी म्हणत वाजंत्रीवर्गालादेखील साथ देऊन या कार्यक्रमाला चांगलीच रंगत आणली होती. या डोहाळजेवणाच्या कार्यक्रमानिमित्त पुरणपोळीचे जेवण राधिकेला भरवून अनेकांनी तिच्या पाठीवरून मायेचा हात फिरवला.पाहुण्यारावळ्यांसह गावातील महिला व ग्रामस्थांनी या डोहाळजेवणाचा मनमुराद आनंद लुटला. तर, या कार्यक्रमाला आसपासच्या गावांतील प्रतिष्ठित मान्यवरांनीदेखील आवर्जून हजेरी लावल्याने या कार्यक्रमाची रंगत आली होती.

टॅग्स :cowगायPuneपुणेJara hatkeजरा हटके