आज शहरातील १८८ केंद्रांवर कोविशिल्ड लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:15 IST2021-08-26T04:15:18+5:302021-08-26T04:15:18+5:30

पुणे : पुणे महापालिकेला बुधवारी ५३ हजार २६० कोविशिल्ड लस शासनाकडून प्राप्त झाल्यामुळे, आज (गुरुवारी, दि.२६) शहरातील १८८ ...

Covishield vaccine at 188 centers in the city today | आज शहरातील १८८ केंद्रांवर कोविशिल्ड लस

आज शहरातील १८८ केंद्रांवर कोविशिल्ड लस

पुणे : पुणे महापालिकेला बुधवारी ५३ हजार २६० कोविशिल्ड लस शासनाकडून प्राप्त झाल्यामुळे, आज (गुरुवारी, दि.२६) शहरातील १८८ केंद्रांवर प्रत्येकी २१० लसीचे डोस महापालिकेकडून वितरीत करण्यात आले आहेत़ तर ससूनसह महापालिकेच्या झोननिहाय ७ दवाखान्यांत प्रत्येकी ५०० कोव्हॅक्सिन लस देण्यात आली आहे़

आज लसीच्या उपलब्ध साठ्यापैकी १८ वर्षांवरील नागरिकांना १५ टक्के लस ही आॅनलाईन बुकिंगद्वारे, तर १५ टक्के लस ही आॅन दी स्पॉट नोंदणी करून पहिला डोस म्हणून मिळणार आहे़ तर कोविशिल्ड लसीच्या उर्वरित साठ्यापैकी ३५ टक्के लस ही ८४ दिवस पूर्ण झालेल्यांना (२ जून पूर्वी लस घेतलेल्यांना) आॅनलाईन बुकिंगद्वारे तर ३५ टक्के लस ही आॅन दी स्पॉट नोंदणी करून दुसरा डोस म्हणून मिळणार आहे़ यानंतरही लस शिल्लक राहिल्यास आॅन स्पॉट नोंदणी करून उपस्थित नागरिकांना लस देण्यात यावी, अशा सूचना प्रत्येक लसीकरण केंद्रास देण्यात आल्या असल्याची माहिती लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली़

लसीकरणाच्या आॅनलाईन बुकिंगकरिता सकाळी ८ वाजता स्लॉट ओपन होणार आहे.

Web Title: Covishield vaccine at 188 centers in the city today