वेल्ह्यात कोविड लसीकरणाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:11 IST2021-02-05T05:11:09+5:302021-02-05T05:11:09+5:30

मार्गासनी: वेल्हे तालुक्यात कोविड लसीकरणाला ग्रामीण रुग्णालय वेल्हे येथे सुरुवात करण्यात आली. तसेच पहिल्याच दिवशी १०५ कर्मचाऱ्यांना ...

Covid vaccination begins in Velha | वेल्ह्यात कोविड लसीकरणाला सुरुवात

वेल्ह्यात कोविड लसीकरणाला सुरुवात

मार्गासनी:

वेल्हे तालुक्यात कोविड लसीकरणाला ग्रामीण रुग्णालय वेल्हे येथे सुरुवात करण्यात आली. तसेच पहिल्याच दिवशी १०५ कर्मचाऱ्यांना कोविडची लस देण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. अंबादास देवकर यांनी दिली.

वेल्हे ग्रामीण रुग्णालयात कोविडच्या लसीकरणाचा शुभारंभ तहसीलदार शिवाजी शिंदे, सभापती दिनकर सरपाले, जिल्हा परिषद सदस्य

अमोल नलावडे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे,पंचायत समिती सदस्या सीमा राऊत, तालुका वैद्यकीय अधिकारी डॅा.अंबादास देवकर

वैद्यकीय अधिकारी डॅा.शैलेश सूर्यवंशी,दीप्ती सूर्यवंशी,सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार,ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष नितीन ढुके,

आदींसह आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

या वेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॅा.अंबादास देवकर म्हणाले की, केंद्र सरकारच्या

कोविड ॲपमध्ये तालुक्यातील ३८० जणांची लसीकरणासाठी नोंदणी करण्यात आली होती. त्यापैकी दि. २५ रोजी

१०५ जणांना पहिल्याच दिवशी लसीकरणांसाठी त्यांच्या मोबाईलवर मेसेज गेला होता, त्यानुसार प्रथम तालुका आरोग्य अधिकारी डॅा.अंबादास देवकर

यांना कोविडची लस देऊन शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर आरोग्य विभागातील कर्मचारी,आरोग्य सेविका आशा,अंगणवाडीताई,आदींना लसिकरण करण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भगवान पवार जिल्हा ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. अशोक नांदापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली

वेल्हे ग्रामीण रुग्णालयात लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली होती.

वेल्हे ग्रामीण रुग्णालय (ता.वेल्हे ) तालुका वैद्यकीय अधिकारी डॅा.अंबादास देवकर यांना कोविडची लस देण्यात आली.यावेळी तहसीलदार शिवाजी

शिंदे,सभापती दिनकर सरपाले,जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे व इतर.

Web Title: Covid vaccination begins in Velha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.