शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

चुलत भावाचा कोयत्याने वार करून खून; इंदापूर तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 10:45 IST

चुलत भावानेच चुलत भावाचा कोयत्याने वार करून खून केल्याची दुर्दैवी घटना...

वालचंदनगर (पुणे) :इंदापूर तालुक्यातील कळंब येथे चुलत भावानेच चुलत भावाचा कोयत्याने वार करून खून केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हनुमंत सर्जेराव जाधव (३६) असे हत्या झालेल्याचे नाव आहे.याबाबत जाधव यांची पत्नी रेश्मा हनुमंत जाधव (२६) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी दत्तात्रय हरिदास जाधव (३८) यास अटक केली आहे.

आरोपी दत्तात्रय जाधव आणि मयत हनुमंत जाधव यांची आई कमल जाधव यांच्यामध्ये २०१२ मध्ये मारामारी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दत्तात्रय जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, दोन्ही कुटुंबात समझोता होऊन भांडणे मिटविण्यात आले होते. या घटनेचा राग दत्तात्रय जाधव यांच्या मनात होता. त्यांंनी बुधवारी (दि. २३) सकाळी ७ वाजेच्या सुमारास हनुमंत जाधव शेतात विद्युत मोटर सुरू करण्यासाठी गेले होते. यावेळी दत्तात्रय जाधव याने पाठीमागून जाऊन हनुमंत जाधव यांच्या डोक्यावर पाठीवर हातावर वार करून जखमी केले.

तसेच शेतातील विहिरीत ढकलून पळून गेले. या घटनेची माहिती कुटुंबीयांना मिळताच त्यांना विहिरीतून काढून बारामतीत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा ९.४५ च्या सुमारास मृत्यू झाला. खुनानंतर आरोपी दत्तात्रय जाधव हा पळून जाऊन उसामध्ये लपला. पोलिसांनी त्याला शिताफीने अटक केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेIndapurइंदापूरCrime Newsगुन्हेगारी