मारणेची हवी न्यायालयीन कोठडी
By Admin | Updated: January 28, 2015 02:24 IST2015-01-28T02:24:05+5:302015-01-28T02:24:05+5:30
पप्पू गावडे खून प्रकरणातील आरोपी गजा मारणे व रूपेश मारणे या दोघांना पोलीस कोठडी मिळालेली असताना पोलिसांनी आरोपींची पोलीस

मारणेची हवी न्यायालयीन कोठडी
पुणे : पप्पू गावडे खून प्रकरणातील आरोपी गजा मारणे व रूपेश मारणे या दोघांना पोलीस कोठडी मिळालेली असताना पोलिसांनी आरोपींची पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून न्यायालयीन कोठडी मिळावी, असा अर्ज केला आहे. विशेष न्यायाधीश प्राची कुलकर्णी यांच्या न्यायालयात हा अर्ज केला आहे. यावर बुधवारी (२८ जानेवारी) सुनावणी होणार आहे.
पप्पू गावडे याचा भाचा
नीलेश ज्ञानेश्वर जाधव (वय २२, रा. किष्किंधानगर कोथरूड) याने याबाबत फिर्याद दिली आहे.
आरोपींना अमोल बधे खून प्रकरणात न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्यानंतर १२ जानेवारी रोजी या दोघांना गावडे खून प्रकरणात अटक केले होते. त्यांना ३ फेब्रुवारीपर्यत पोलिस कोठडी सुनावली होती.
(प्रतिनिधी)