शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

फसवून घेतलेल्या घटस्फोटप्रकरणी कोर्टाचा पतीला दणका; पत्नीला दरमहा ७ हजार पोटगी देण्याचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 18:31 IST

पती छोट्या किरकोळ कारणांवरून मोठे भांडण करणे, घाणेरड्या शिव्या देणे, घालून पाडून बोलणे, धमक्या देणे आदी प्रकारचा त्रास

पुणे: पत्नीच्या कायद्याबाबतच्या अज्ञानाचा फायदा घेऊन तिच्यावर दबाव टाकून प्रतिज्ञापत्रावर सही करण्यास भाग पाडून फसवून घटस्फोट घेतल्याप्रकरणी कौटुंबिक न्यायालयाने केसचा निकाल लागेपर्यंत पत्नीने दाखल केलेला पोटगीचा अर्ज अंशतः मंजूर केला असून, पत्नीला दरमहा ७ हजार रुपये देण्याचा पतीला आदेश दिला. कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश पी.एम. पाटील यांनी हा अंतरिम निर्णय दिला.

ॲड. अमोल बाबूराव आलमन यांनी न्यायालयात पत्नीची बाजू मांडली. स्मिता आणि राकेश (नाव बदलेले) यांचे २ जुलै २०२१ रोजी लग्न झाले. राकेश एक सामाजिक संस्था चालवून सुमारे लाखो रुपये कमावतात. लग्न झाल्यानंतर राकेश हा त्यांच्या तथाकथित मैत्रिणीच्या सांगण्यावरून स्मिताचा मानसिक छळ करू लागला. छोट्या किरकोळ कारणांवरून मोठे भांडण करणे, घाणेरड्या शिव्या देणे, घालून पाडून बोलणे, धमक्या देणे आदी प्रकारचा त्रास देऊ लागला. धक्कादायक बाब म्हणजे राकेशने मैत्रिणीशी संगनमत साधून २६ मार्च २०२२ रोजी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर एकतर्फी प्रतिज्ञापत्र तयार करून स्मिताला प्रतिज्ञापत्रावर सही करण्यास भाग पाडले. या प्रतिज्ञापत्राच्या मजकुरात दोघांचा घटस्फोट झाला असून, त्यांच्यातील कौटुंबिक नाते संपुष्टात आले आहे, असा आशय नमूद करण्यात आला होता. स्मिताने या प्रतिज्ञापत्राच्या मजकुरावर विश्वास ठेवून पुढील आयुष्य जगत राहिली.

ॲड. अमोल बाबूराव आलमन यांनी कायद्याच्या दृष्टिकोनातून प्रतिज्ञापत्रास काहीही किंमत नाही. हिंदू, बौद्ध, जैन व शीख या धर्मांचे पालन कारणाऱ्या लोकांचा विवाह व घटस्फोट केवळ हिंदू विवाह कायदा १९५५ च्या तरतुदीनुसारच होऊ शकतो ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने पत्नीला अंशत: पोटगी मंजूर केली.

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयadvocateवकिलhusband and wifeपती- जोडीदारMONEYपैसा