‘सारस अर्बन’ पतसंस्थेत नियम डावलून कर्जवाटप, न्यायालयाने दिले चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:12 IST2021-07-14T04:12:23+5:302021-07-14T04:12:23+5:30

फोलाने यांच्या तक्रारीनुसार सारस अर्बन क्रेडिटचे संचालक व अध्यक्ष गणेश धारप यांच्या व्यवस्थापनाखाली सर्व नियम डावलून ही कर्ज ...

Court orders inquiry into loan disbursement in 'Saras Urban' credit union | ‘सारस अर्बन’ पतसंस्थेत नियम डावलून कर्जवाटप, न्यायालयाने दिले चौकशीचे आदेश

‘सारस अर्बन’ पतसंस्थेत नियम डावलून कर्जवाटप, न्यायालयाने दिले चौकशीचे आदेश

फोलाने यांच्या तक्रारीनुसार सारस अर्बन क्रेडिटचे संचालक व अध्यक्ष गणेश धारप यांच्या व्यवस्थापनाखाली सर्व नियम डावलून ही कर्ज दिली गेली. तसेच कर्ज असणाऱ्या मालमत्तांच्या सातबाराच्या उताऱ्यांवर कर्जाच्या नोंदी होऊ दिल्या नाहीत. त्यामुळे या जमिनी परस्पर विकता येत असतं. असे सर्व गैरप्रकार हाताळण्यासाठी गणेश धारप यांनी वैकुंठ कुंभार नावच्या कर्जदाराकडून २ कोटी रुपयांची लाच घेतल्याचेही तक्रारीमध्ये म्हटले आहे.

तसेच महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष (राज्यमंत्री) व यशवंत बँकेचे चेअरमन शेखर चरेगावकर यांनाही धारप याने संचालक मंडळाच्या कोणत्याही पूर्व मान्यते शिवाय वा कोणत्याही तारणाशिवाय मुदत ठेवीवर कर्ज व ओवरड्राफ्टची देखील सुविधा अशाच पद्धतीने उपलब्ध करून दिल्याचे समजते. शेखर चरेगावकर यांचे नाव पुढे थकबाकीदारांच्या यादीत येऊन देखील चरेगावकर यांच्या राजकीय वर्तुळातील ओळखी लक्षात घेऊन त्यांच्यावर कोणतीही कारवाई सोसायटीनी केली नसल्याचेही समजत असल्याचे तक्रारदारांचे वकील अँड ऋषीकेश चव्हाण यांनी सांगितले. प्राथमिक अंदाजानुसार ११ कोटी रुपयांएवढा मोठा घोटाळा असू शकतो. सहकारी पतसंस्था तसेच सहकारी बँकांमध्ये अशा स्वरूपाचे घोटाळे नित्याचे होत चालले असून, या सहकारी संस्थांच्या मूळ संकल्पनेलाच धोका निर्माण झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. महाराष्ट्रात यापूर्वी पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक व त्या पाठोपाठ शिवाजीराव भोसले सहकारी बँक अनेक बँक पतसंस्था मधील अशाच पद्धतीचे कोट्यवधी रुपयांचे घोटाळे समोर आले आहेत. सारस को-आॅप क्रेडीट सोसायटीचा घोटाळा हा याच प्रकारचा अजून एक मोठा दखलपात्र गुन्हा ठरू शकतो, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.

-------------------------------------------------------------

Web Title: Court orders inquiry into loan disbursement in 'Saras Urban' credit union