पैसे देण्याचा न्यायालयाचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:09 IST2021-03-27T04:09:44+5:302021-03-27T04:09:44+5:30
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, प्रीतम ढेरंगे याने फिर्यादी अंकुश मलंग शिंदे यांच्याकडून डिसेंबर २०१३ रोजी ८८ लाख ...

पैसे देण्याचा न्यायालयाचा आदेश
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, प्रीतम ढेरंगे याने फिर्यादी अंकुश मलंग शिंदे यांच्याकडून डिसेंबर २०१३ रोजी ८८ लाख ५० हजार रूपये एक वर्षाच्या परत बोलीवर घेतले होते. परंतु मुदतीत त्यांनी ते पैसे परत केले नाहीत. त्यामुळे प्रीतम ढेरंगे यांनी दिलेल्या ८८ लाख ५० हजारांचा चेक फिर्यादी अंकुश शिंदे यांनी बँकेत भरला. तो चेक खात्यात पैसे शिल्लक नसल्याने वटला नाही. त्यामुळे अंकुश शिंदे यांनी घोडेगाव न्यायालयात जुलै २०१६ मध्ये खटला दाखल केला. यात ४ वर्षे ७ महिने सुनावणी होऊन न्यायाधीश संजय मुळीक यांनी प्रीतम ढेरंगे याने १ कोटी ७७ लाख रूपये फिर्यादी अंकुश शिंदे यांना देणे तसेच तीन महिने कारावासाची शिक्षा दिली. फिर्यादीच्या वतीने अॅड. अशोक नेहे यांनी काम पाहिले.