शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेला न्यायालयाचा दणका; कष्टकरी कुटुंबीयांना ११ लाखांची नुकसानभरपाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 09:56 IST

- दिवाणी न्यायालयाचा निर्णय; ‘शौचालयाच्या टाकीत बुडून मुलाचा मृत्यू’ प्रकरण

पुणे : मुलाचा शौचालयाच्या टाकीत बुडून मृत्यू झाल्याचा ठपका ठेवत त्याच्या कुटुंबीयांना ११ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिवाणी न्यायाधीश विक्रमसिंग भंडारी यांनी दिला. याप्रकरणी महानगरपालिकेवर हलगर्जी आणि निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे.

दि.९ एप्रिल २०१८ रोजी कसबा पेठ परिसरात घडलेल्या घटनेत तुषार बाबू रामोशी या बारावर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. याप्रकरणी पुणे महानगरपालिका, आयुक्त, बांधकाम व नियंत्रण विभाग व आरोग्य विभागाच्या प्रमुखांविरोधात दावा दाखल करण्यात आला होता.तुषारची आई या मोलकरीण, तर वडील बिगारी काम करतात. घटनेच्या दिवशी तुषार रात्री ०८:३० वाजेच्या सुमारास शौचासाठी गेला. मात्र, बराच वेळ जाऊन तो परतला नाही. त्यानंतर त्यांनी इतरत्र शोध घेतला.शौचालयात जाऊन शोध घेतला असता तो शौचालयाच्या पाण्याच्या टाकीत तरंगत असल्याचे दिसून आले. त्याला बाहेर काढून दवाखान्यात नेले असता त्याचा पाण्यात बुडाल्यामुळे गुदमरून मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शवविच्छेदन अहवालातूनही ते स्पष्ट झाल्याने पुणे महापालिका आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणासह निष्काळजी आणि कर्तव्यात कसूर केल्याने मुलाचा मृत्यू झाल्याचे नमूद करीत रामोशी दाम्पत्याने ॲड. अमित राठी व ॲड. पूनम मावाणी यांच्यामार्फत न्यायालयात धाव घेतली. त्यांना ॲड. आदित्य जाधव व ॲड. प्राची जोग यांनी सहकार्य केले. मुद्रांक शुल्क भरण्याची क्षमता नसल्याने भरपाई चारपटींनी कमीमुलाच्या मृत्यूप्रकरणी कुटुंबीयांकडून तुषारवर झालेला रुग्णालयाचा खर्च म्हणून ८० हजार रुपये, अंत्यविधीचा खर्च २० हजार रुपये, मानसिक धक्क्यापोटी ५ लाख रुपये, तर कुटुंबीयांना सोसाव्या लागलेल्या उत्पन्नाऐवजी नुकसानीची रक्कम ४५ लाख रुपये, असे एकूण ५१ लाख रुपये नुकसान झाल्याचे नमूद केले. मात्र, कुटुंबीयांची मुद्रांक शुल्क देण्याची क्षमता नसल्यामुळे त्यांनी ११ लाख रुपये नुकसानभरपाईची मागणी करीत त्यावर १२ टक्के व्याज मिळावे, यासाठी न्यायालयाकडे मागणी केली. न्यायालयाने ती मंजूर केली. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMuncipal Corporationनगर पालिका