शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
3
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
4
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
5
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
6
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
7
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
8
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
9
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
10
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
11
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
12
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
13
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
14
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
15
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
17
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
18
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
19
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
20
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ

न्यायालयात वकिलांना मिळणार आता २५ रुपयांत पोटभर जेवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 3:37 PM

शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयात राज्यभरातून आलेल्या वकिलांची जेवणाची मोठी गैरसोय होत असत. न्यायालयात कमी पैशात चांगल्या जेवणाची सोय झाल्याने त्यांना मोठा फायदा होणार आहे.  

ठळक मुद्देज्युनिअरसह इतर वकिलांच्या जेवणाचा प्रश्न लक्षात घेता ही सुविधा सुरू या जेवणात पोळी, एक रस्सा भाजी, एक सुकी भाजी आणि डाळ-भात असे पदार्थ असणार

पुणे : महागाईमुळे खाद्यपदार्थांच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्याने वकिलांना केवळ २५ रुपयांत पोटभर जेवण देण्याचा उपक्रम पुणे बार असोसिएशनने सुरू केला आहे. त्यामुळे आता वकिलांना कमी किंमतीत चांगले जेवण मिळणार आहे.         या जेवणात पोळी, एक रस्सा भाजी, एक सुकी भाजी आणि डाळ-भात असे पदार्थ असणार आहे. पुणे बार असोसिएशनच्या साई कॅन्टीनमध्ये हे जेवण मिळणार आहे. सोमवारपासून हा उपक्रम सुरू झाल्याची माहिती पुणे बार असोसिसशनचे अध्यक्ष अडॅ. सुभाष पवार यांनी दिली. बारच्या नवीन कार्यकारिणीने सुरू केलेल्या या उपक्रमामुळे वकिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. वकिलीचा अभ्यास करण्यासाठी शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयात येत असणा-या ज्युनिअर वकिलांची संख्या मोठी आहे. राज्यभरातून आलेल्या या वकिलांची जेवणाची मोठी गैरसोय होत असते. त्यातील अनेक वकील हे सकाळी लवकर न्यायालयात येवून उशिराने घरी जातात. त्यामुळे जेवण करण्यासाठी मेसला जाणे शक्य होत नव्हते. तसेच मेससाठी मोठ्या प्रमाणात पैसे द्यावे लागत. मात्र, आता न्यायालयात कमी पैशात चांगल्या जेवणाची सोय झाल्याने त्यांना मोठा फायदा होणार आहे.       हा उपक्रम सुरू करण्यात आलेले कॅन्टीन असोसिएशनच्या वतीने चालविण्यासाठी देण्यात आले आहे. त्यामुळे याठिकाणी वकिलांसाठी जेवण्याची चांगली सुविधा देण्याचा विचार सुरू होता. ज्युनिअरसह इतर वकिलांच्या जेवणाचा प्रश्न लक्षात घेता ही सुविधा सुरू करण्यात आल्याचे बारच्या पदाधिका-यांनी सांगितले. पुण्याबाहेरून आलेल्या वकिलांना अशा सुविधेची खूप गरज होती. असोसिएशनने त्यांची गरज लक्षात घेता हा उपक्रम सुरू केला आहे. अधिकाधिक वकिलांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन असोसिएशनचे उपाध्यक्ष अ‍ॅड. भूपेंद्र गोसावी यांनी केले आहे. 

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयfoodअन्न