बोपदेव घाटात दाम्पत्याला लुबाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:12 IST2021-04-08T04:12:39+5:302021-04-08T04:12:39+5:30

पुणे : गावावरून पुण्याला दुचाकीवरून परत येत असताना दाम्पत्याला चौघांनी बोपदेव घाटात अडवून जीवे मारण्याची धमकी देऊन लुटल्याचा प्रकार ...

The couple was robbed in Bopadev Ghat | बोपदेव घाटात दाम्पत्याला लुबाडले

बोपदेव घाटात दाम्पत्याला लुबाडले

पुणे : गावावरून पुण्याला दुचाकीवरून परत येत असताना दाम्पत्याला चौघांनी बोपदेव घाटात अडवून जीवे मारण्याची धमकी देऊन लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. चोरट्यांनी त्यांच्याकडील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला. यावेळी महिलेने प्रसंगावधान राखून रस्त्याने येणार्‍या गाड्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला़ हे पाहून चोरटे पळून गेले.

याप्रकरणी बाळासाहेब भिंताडे (वय ५५, रा. गुरुवार पेठ) यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. भिंताडे हे शहरातील एका कंपनीत काम करतात. त्यांच्या नातेवाईकांचा मृत्यू झाल्याने ते अत्यंसंस्कारासाठी पुरंदर तालुक्यातील मूळगावी गेले होते. रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ते पत्नीसह दुचाकीवरून बोपदेव घाटातून पुण्याकडे येत होते. या वेळी चौघांनी अचानक त्यांना अडविले. त्यांना जीव मारण्याची धमकी देऊन त्यांच्या खिशातील मोबाईल हिसकाविला. या वेळी त्यांच्या पत्नीने जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांना हात दाखवून आरडा रडा करण्यास सुरुवात केल्याने चोरटे पळून गेले. सहायक पोलीस निरीक्षक चेतन मोरे अधिक तपास करीत आहेत.

........

लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : प्रेमाचे नाटक करून लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे़. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी अनिल हनुमंत म्हेत्रे (वय २२, रा़ धानोरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अनिल म्हेत्रे याने एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवले. तिला वेगवेगळ्या लॉजवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच फिर्यादी मुलीचे खासगी फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. याची माहिती मुलीने घराच्यांना दिल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन विश्रांतवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

Web Title: The couple was robbed in Bopadev Ghat