शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

देशाला दुसऱ्या हरित क्रांतीची गरज :  राकेश मोहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 16:44 IST

देशाची आर्थिक प्रगती व्हायची असेल तर तुमच्या उद्योग क्षेत्राची प्रगती व्हायला हवी..

ठळक मुद्दे कृषी पूरक उद्योगांवर लक्ष देण्याची आवश्यकताकारची संख्या वाढतेय, करदात्यांची नाही

पुणे : उद्योग हा देशाच्या आर्थिक स्थितीचा कणा असतो. उत्पादनक्षम उद्योगांना प्रोत्साहन देताना कृषी आणि पूरक उद्योगांकडे देखील लक्ष द्यायला हवे. कृषी म्हणजे केवळ डाळी आणि धान्य असा विचार न करता त्या जोडीला मत्स्य शेती, दूध आणि दूध प्रक्रिया उद्योग, शेतमाल प्रक्रिया उद्योग अशी साखळीच उभारावी लागेल. त्यासाठी दुसरी कृषी क्रांती होण्याची गरज असल्याचे मत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) माजी डेप्युटी गव्हर्नर डॉ. राकेश मोहन यांनी व्यक्त केले. पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या वतीने गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अ‍ॅँण्ड इकोनॉमिक्सच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात  ‘मूव्हींग इंडिया टून अ न्यू ग्रोथ ट्रॅजेक्टरी’ या विषयावर ते मंगळवारी बोलत होते. टाटा सन्सचे नॉन एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर इशात हुसैन उपस्थित होते. डॉ. मोहन म्हणाले, देशाची आर्थिक प्रगती व्हायची असेल तर तुमच्या उद्योग क्षेत्राची प्रगती व्हायला हवी. त्यात गेल्या काही वर्षांमधे वाढ होताना दिसत नाही. त्याच सोबत कृषी, ऊर्जा आणि पायाभूत सुविधांमधे वाढ झाली पाहिजे. या सर्वांसाठी कौशल्यपूर्ण मनुष्यबळ आवश्यक असल्याने सर्वांना माध्यमिक शिक्षण मोफत दिले पाहीजे. उद्योगांमधे अधिकाधिक तंत्रज्ञान वाढविले पाहिजे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टिकतील असे उद्योग निर्माण केले पाहिजे. तसेच, तयार झालेल्या उत्पादनाला शाश्वत बाजारपेठ मिळेल, यावर लक्ष द्यायला हवे. देशासह आशियाई देशांची एकूण लोकसंख्या ४ अब्ज आहे. आपल्या आजुबाजूलाच मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. त्या संधीचा उपयोग केला पाहिजे. औद्योगिक संस्थांच्या उभारणी पाठोपाठ कृषी आणि पूरक उद्योगाची वाढ झाली पाहिजे. आता धान्य व डाळी यावर आपण थांबता कामा नये. शेतकऱ्यांनाच पिकविलेल्या मालाचे पूरक उद्योग उपलब्ध करुन द्यायला हवेत. आपल्या आहारामधे कोणकोणते घटक वापरले जातात, हे पाहून उद्योगांची निर्मिती करावी. मत्स्यशेती, दूग्ध पदार्थांपासून उपपदार्थ अशा विविध प्रक्रिया उद्योगांसाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. त्या जोडीला वाहतूक व साठवणुकीची सुविधा उभारायला पाहिजे, असे डॉ. मोहन म्हणाले. ---कारची संख्या वाढतेय, करदात्यांची नाहीदेशाच्या उभारणीसाठी करसंकलन हा एक महत्त्वाचा घटक असतो. मात्र, देशात चारचाकी वाहनांची संख्या वाढत असली तरी करदात्यांच्या संख्येत फारशी वाढ होताना दिसत नाही. उलट एकूण सकल उत्पन्नाच्या तुलनेत करदात्यांच्या टक्केवारील गेल्या दहा वर्षांत १२वरुन अकरापर्यंत घटझाली आहे. अगदी पुण्याचे उदाहरण घ्यायचे झाल्यास, अनेक आलिशान संकुले उभारलेली दिसतात. त्या तुलनेत करदात्यांची संख्या फारशी नाही. कराच्या टक्क्यात नव्हे, तर दात्यांच्या संख्येत वाढ झाली पाहीजे, असे डॉ. राकेश मोहन म्हणाले. 

टॅग्स :Puneपुणेagricultureशेती