शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Video: तेरा वर्षात सुप्रिया सुळेंना ते सुधारता आलं नाही का? खडकवासला घटनेवरून तृप्ती देसाईंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 16:04 IST

खासदार सुप्रिया सुळे अकार्यक्षम असल्यामुळे आणि त्यांनी लक्ष न दिल्यामुळे खडकवासला सारख्या घटना घडतात

पुणे : खासदार सुप्रिया सुळे अकार्यक्षम असल्यामुळे आणि त्यांनी लक्ष न दिल्यामुळे खडकवासला सारख्या घटना घडतात, असा आरोप भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती  देसाई यांनी केला आहे. गेल्या १३ वर्षांपासून खासदार सुप्रिया सुळे काय करतायेत जिथे हजारो पर्यटक फिरायला येतात तो सुधारता आला नाही का असा प्रश्न देसाई यांनी सुळे यांना विचारला आहे.

पुण्यातील खडकवासला बॅकवॉटरमध्ये कपडे धुवायला गेलेल्या ९ मुलींपैकी दोघींचा बुडून मृत्यू झाला. पाय घसरून पाण्यात पडलेल्या दाेघींना वाचवायला गेलेल्या दोघींना आपला जीव गमावावा लागला. ही दुर्दैवी घटना सोमवारी (दि. १५) सकाळी खडकवासला बॅकवॉटरमध्ये घडली. बुलढाणा जिल्ह्यातून एका नातेवाइकाच्या कार्यक्रमासाठी या मुली आल्या होत्या. मुलींचा नातेवाईक संजय लहाणे हे धरणाच्या काठी असलेल्या गोऱ्हे खुर्द गावात काम करतात. त्यांची झोपडी पाण्यापासून जवळच आहे. तिथे त्या मुली व काही महिला आल्या होत्या. कपडे धुवायचे म्हणून मुली पाण्याकडे गेल्या होत्या. ही घटना सुप्रिया सुळेंच्या मतदार संघात घडल्याने देसाई यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. 

सुप्रिया सुळे सक्षम नसल्याचा दावा 

 शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव पुढे येईल ,असे वाटले होते .मात्र त्या तेथे सक्षम ठरल्या नसल्याचे सांगून त्या बारामती मतदार संघातही सक्षम नसल्याचा टोला यावेळी देसाई यांनी लगावला होता. 

...तर बारामतीत इतिहास घडवू शकते

बारामती लोकसभा मतदार संघात जनसंपर्क दौऱ्याला सुरुवात करणार आहे. मात्र बारामती जिंकायची असेल, भारतीय जनता पक्षाने जर मला उमेदवारी दिल्यास बारामतीत इतिहास घडवू शकते ,असंही देसाई म्हणाल्या होत्या.  

टॅग्स :PuneपुणेTrupti Desaiतृप्ती देसाईSupriya Suleसुप्रिया सुळे