शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्याहून उड्डाण केलेल्या विमानाला गिधाडाची धडक, रांचीत इमर्जन्सी लँडिंग; 4000 फूट उंचावर अडकला होता 175 जणांचा जीव
2
Video: फिल्मी स्टाईल पाठलाग करून ७ जणांनी एकाची केली हत्या; CCTV पाहून अंगावर काटा येईल
3
तो हल्ला रशियाला वाटाघाटी करण्यास भाग पाडेल; शांतता बैठकीच्या एक दिवस आधी हल्ला का केला? झेलेन्स्कींनी सांगितले...  
4
अमेरिका-चीनदरम्यान थांबणार का ट्रेड? अर्धी झाली मालवाहू जहाजांची संख्या, कारण काय?
5
सूर्याची उष्णता...सर्वकाही राख होणार..; रशियाची युक्रेनला "वॉरहेड" हल्ल्याची धमकी
6
"आपण तुझ्या लग्नात हुंडा मागू, आयुष्यभर पुरतील इतके..." असं का म्हणालेले संकर्षणचे वडील? अभिनेत्याची पोस्ट
7
Asia Cup 2025: एमर्जिंग महिला आशिया चषक स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित, कारण काय?
8
धक्कादायक! प्रेमविवाहानंतर वडिलांसोबत मिळून पतीची हत्या; कारण जाणून धक्का बसेल
9
चहावाल्याचा मुलगा MBA झाला, परदेशात नोकरीची ऑफर; १५ लाखांचे पॅकेज, वडील झाले भावुक
10
रणजित कासले याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; कोर्टाबाहेर सरकारविरोधात दिल्या घोषणा
11
Astrology: ३ जून रोजी पाच राशींवर होणार मारुतीरायाची कृपा; पैशात होईल दुप्पट वाढ!
12
लश्कर-ए-तोयबा आणि जैश ए मोहम्मदचा भारताविरोधात नवा कट उघड; पाकिस्तान करतंय फंडिंग
13
थरकाप उडवणारी घटना...! ५७ वर्षीय महिलेचे घरमालकाशीच सुरू होते प्रेम प्रकरण, मालमत्ता हडपण्यासाठी जिवंत जाळलं!
14
'मोठ्या घरची राणी, मात्र बदनाम केलं हगवणेंनी..."; फॉर्च्युनर गाडीवरील मजकुराची सोशल मीडियावर चर्चा
15
एक्सने कात टाकली! नवे मॅसेंजिंग फीचर XChat लाँच केले; ऑडिओ, व्हिडिओ कॉलही होणार...
16
Coronavirus: ठाण्यात ४३ वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू, महाराष्ट्रातील मृतांचा आकडा ८ वर
17
क्रिकेट विश्वात एकाच दिवशी दोन धक्के! मॅक्सवेलनंतर आणखी एका स्टार खेळाडूचा क्रिकेटला रामराम
18
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीसमोर नवं आव्हान; सर्वात मोठ्या शत्रू देशाने भारताला दिली ऑफर
19
S-400 सोबत 'हे' भारतीय शस्त्र असतं, तर फेल झाला असता युक्रेनचा प्रत्येक हल्ला; ऑपरेशन सिंदूरवेळी संपूर्ण जगानं बघितलीय कमाल!
20
Virat Kohli: विराट कोहलीची दहावीची मार्कशीट व्हायरल, त्याला किती मार्क्स मिळाले? पाहा

पाेहता आले नाही; दम लागून ४ मुले बुडाली; सहावी-सातवीच्या वर्गात शिकणारी होती सर्व मुले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 06:28 IST

नातेवाइकांनी मृतदेह पाहताच फोडला हंबरडा

लोकमत न्यूज नेटवर्क, चाकण: कडाचीवाडी (ता. खेड) येथील पाझर तलावात पोहायला गेलेल्या चार शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. ३१) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी स्थानिक नगरिकांच्या मदतीने चिमुरड्यांचे मृतदेह बाहेर काढले.

ओमकार बाबासाहेब हंगे (वय १३, सध्या रा. मार्तंडनगर, मेदनकरवाडी, मूळ रा. हंगेवाडी, ता. केज, जि. बीड), श्लोक जगदीश मानकर (वय १३, सध्या रा. मेदनकरवाडी,मूळ रा. धनवडी, ता. वरुड, जि. अमरावती), प्रसाद शंकर देशमुख (वय १३, सध्या रा. मेदनकरवाडी, मूळ रा. अंबुलगा, ता. मुखेड, जि. नांदेड), नैतिक गोपाल मोरे (वय १३, सध्या रा. मेदनकरवाडी, मूळ रा. बुलढाणा झरी बाजार, ता. अकोट, जि. अकोला)अशी बुडून मृत्युमुखी पडलेल्या शाळकरी मुलांची नावे आहेत. ही सर्व मुले सहावी-सातवीच्या वर्गात शिकत असल्याचे समजते.

नातेवाइकांनी मृतदेह पाहताच फोडला हंबरडा

याबाबतची अधिक माहिती अशी की, ओमकार, श्लोक, प्रसाद आणि नैतिक हे चौघे जण शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास चाकण जवळील कडाचीवाडी गावाच्या हद्दीतील पाझर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहताना दमछाक होऊन या सर्वांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. दुपारपर्यंत हे चौघे जण घरी न आल्याने नातेवाइकांनी त्यांचा परिसरात शोध घेतला. पाझर तलावाच्या काठावर त्यांच्या चपला व कपडे मिळून आले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी पाण्यात बुडालेल्या मुलांचे मृतदेह बाहेर काढले. चाकण पोलिसांनी माहिती मिळताच धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला.

या प्रकरणी आकस्मिक मृत्यू, अशी नोंद केली आहे. नातेवाइकांनी मुलांचे मृतदेह पाहताच एकच हंबरडा फोडला. हे दृश्य हृदय हेलावून टाकणारे होते. या दुर्दैवी घटनेने चारही मुलांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेDeathमृत्यूPuneपुणे