शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पुणे मेट्राेचे डबे पिंपरी - चिंचवडमध्ये दाखल ; नागरिकांनी केले स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2019 20:03 IST

पुणे मेट्राेचे डबे नागपूर येथील कारखान्यातून पिंपरी - चिंचवड शहरात दाखल झाले असून नागरिकांनी त्यांचे वाजत गाजत स्वागत केले.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीचे प्रवेशद्वार असणाऱ्या निगडीतील भक्ती- शक्ती चौकात पुणेमेट्रोचे नवीन डबे आल्यानंतर मेट्रोच्या कामगारांनी ढोल ताशांचा दणदणाट करून स्वागत केले. शिंदेशाही पगडी आणि फेटे कामगारांनी परिधान करून ढोल आणि तुतारीच्या गजरात डब्यांचे स्वागत केले. वाजत गाजत शहरात मेट्रोचे डबे आणण्यात आले.

स्वारगेट ते पिंपरी या टप्यातील पिंपरी ते दापोडी या मेट्रोमार्गाचे काम अंतिम टप्यात आले आहे. दापोडीपर्यंत ट्रॅक तयार केला आहे. त्यामुळे मेट्रो रेल प्रशासनाने पहिल्या टप्यांची मेट्रो सुरू करण्याचे नियोजन केले आहे. या मार्गावर मेट्रो स्टेशन उभारण्याचे कामही वेगात सुरू आहेत. पिंपरीतील एच ए कॉलनीजवळ शहराच्या महापौर उषा ढोरे आणि स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी मेट्रोच्या डब्यांचे पूजन केले. यावेळी मेट्रोचे उप अभियंता बापूसाहेब गायकवाड, जनसंपर्क अधिकारी निवृत्त कर्नल नितिन जोशी, मेट्रोचे उप सुरक्षा अधिकारी गोरख भावसार आदि मान्यवर उपस्थित होते. पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्याची चाचणी होणार असून त्यासाठी आज डबे येणार होते. रविवारी दुपारी चारच्या सुमारास पिंपरी-चिंचवड शहराचे प्रवेशद्वार निगडीतील भक्ती शक्ती चौकात आल्यानंतर मेट्रोच्या कामगारांनी ढोल ताशांचा दणदणाट करून स्वागत केले. शिंदेशाही पगडी आणि फेटे कामगारांनी परिधान केले होते. ढोल आणि तुतारीच्या गजरात डब्यांचे स्वागत केले. वाजत गाजत शहरात मेट्रोचे डबे आणले.  स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी म्हणाले, ‘‘शहरात आज मेट्रोचे चार डबे दाखल झाले आहेत. मेट्रो सेवा तातडीने सुरू होण्यासाठीचे हे महत्वाचे पाऊल आहे. सोमवारी दुपारनंतर क्रेनच्या साह्याने हे डबे मेट्रोच्या ट्रॅकवर ठेवण्यात येणार आहे. आत्ताच्या  डब्यांची ९६० आसनांची व्यवस्था असणार आहे. तसेच पुढील आठवड्यात आणखी चार डबे येणार आहेत. ही सेवा नागरिकांनी लवकरच सुरू करून देण्यासाठी प्रयत्न असणार आहे.’’

टॅग्स :Metroमेट्रोPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड