शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

टँकर पुरवठाधारकांकडून होतोय भ्रष्टाचार : मनसेचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 11:47 IST

पुणे पालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या तीन गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी नेमलेल्या टँकर पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराकडून भलत्याच ठिकाणी पाणी पोचवले जात आहे.

ठळक मुद्देटँकर पॉईंट कर्मचाºयांची बदली करण्याची मागणीया भ्रष्टाचारात पालिकेचे अधिकारी सहभागी असल्याचा आरोप उच्चभ्रू सोसायट्या आणि मोठ्या कंपन्यांना चढ्या भावाने ग्रामस्थांच्या हक्काचे पाणी

पुणे : पालिकेच्या हद्दीमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या तीन गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी नेमलेल्या टँकर पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराकडून भलत्याच ठिकाणी पाणी पोचवले जात आहे. उच्चभ्रू सोसायट्या आणि मोठ्या कंपन्यांना चढ्या भावाने ग्रामस्थांच्या हक्काचे पाणी विकून स्वत:च्या तुंंबड्या हे ठेकेदार भरत असून या भ्रष्टाचारात पालिकेचे अधिकारी सहभागी असल्याचा आरोप पालिकेतील मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली. याबाबतच्या मागण्यांचे पत्र त्यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहे. यावेळी नगरसेवक साईनाथ बाबर, खासगी टँकर मालक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. मोरे म्हणाले, पालिकेने उरुळी देवाची, फुरसुंगी आणि शेवाळवाडी या गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवित टँकर सुरु केले. जाधव वॉटर टँकर आणि एन. वाय. शिवरकर या दोघांना याचा ठेका घेतला. रामटेकडी येथील पॉईंटवर टँकर भरुन ते तीन गावांमध्ये नागरिकांपर्यंत पोचविणे अपेक्षित आहे. परंतू, टँकर पॉईंटवरुन पाणी भरल्यानंतर हे टँकर उंड्री, एनआयबीएम येथील खासगी सोसायट्या आणि खराडीमधील मोठ्या कंपनीमध्ये नेण्यात आले. तेथे पाणी पोचविल्याच्या नोंदीही सुरक्षा रक्षकांच्या रजिस्टरमध्ये करण्यात आलेल्या आहेत. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या टँकर्सचा पाठलाग केल्यावर हा प्रकार उघडकीस आल्याचे मोरे म्हणाले. पालिकेचे पाणी फुकटात उचलून पाण्याचा पुरवठा केल्याचे पैसे घ्यायचे आणि हेच पाणी खासगी सोसायट्यांसह कंपन्यांना विकून तेथूनही पैसे कमवायचे असा गोरखधंदा सध्या सुरु आहे. टँकर पॉईंटवरील पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी यामध्ये सामिल आहेत. त्यामुळे या टँकरच्या जीपीआरएसच्या नोंदी घेतल्या जात नाहीत. त्याउलट महापालिकेकडून पाणी विकत घेउन त्याची नियमानुसार विक्री करणाऱ्या खासगी टँकरचालकांना मात्र वेळेत पास दिले जात नाहीत. त्यांनी अधिकाऱ्यांच्या सुचनेवरुन जीपीएस सिस्टीम बसवूनही वरिष्ठ अधिकारी देशमुख नावाच्या व्यक्तिकडूनच पुन्हा नवीन जीपीएस यंत्रणा बसविण्यासाठी दबाव टाकत असल्याचे मोरे यांनी सांगितले. ====पालिका आयुक्तांनी या ठेकेदारांचे ठेके रद्द करावेत तसेच दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी मोरे यांनी केली आहे. टँकर पॉईंटवर वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची तात्काळ बदली करावी अन्यथा मनसे आणि खासगी टँकर मालक संघटनेच्या माध्यमातून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका