शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

PMPच्या मुन्नाभाईंची अजब नौटंकी, सब गोलमाल है…पारदर्शकतेवरच प्रश्न, स्वार्थ नेमका कुणाचा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 06:15 IST

संचालक मंडळ बैठकीचा बनाव, सीएनजी बसखरेदीचा घाट; एवढी कसली घाई? कुणाच्या स्वार्थासाठी नागरिक वेठीस?

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: पाचशे सीएनजी बस भाडेतत्त्वावर घेण्यास सर्व अधिकार्‍यांचा विरोध असूनही, पीएमपीएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी खोटारडेपणा करून, पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांवर हा निर्णय लादल्याचे स्पष्ट झाले आहे. 

संचालक मंडळाची बैठक वीस नोव्हेंबरला झाल्याचा दावा देवरेंचा आहे खरा, मात्र ही बैठक म्हणजे नौटंकी होती. अगदी शेवटच्या क्षणी ही बैठक बोलावल्याने पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी तसे कळवून, बैठक आयोजित करण्याची ही पद्धत नाही, असे सांगितले. पुण्याचे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनीही बैठकीला जाणे टाळले. ज्या प्रकारे हा व्यवहार सुरू आहे, ते त्यांना मान्य नव्हते. असे असूनही पंकज देवरे यांनी बैठकीचा फार्स केला आणि सर्व आवश्यक बाबींची पूर्तता झाल्याचे सांगितले. 

सगळ्या प्रमुख अधिकार्‍यांचा विरोध असूनही, संचालक मंडळाची रितसर परवानगी घेतल्याचे सांगणे हा खोटारडेपणाचा कळस होता. ही प्रक्रिया अजिबात पारदर्शक नव्हती, असे खुद्द महापालिका आयुक्त सांगत आहेत. ज्या बैठकीला आपण नव्हतो आणि या पूर्ण प्रक्रियेला आपण विरोध केला, असे वरिष्ठ अधिकारी स्वतः सांगत आहेत, त्या संदर्भात देवरे करत असलेली दिशाभूल फारच धक्कादायक असल्याचे मत व्यक्त होत आहे.  

दर निश्चितीनंतर वाटाघाटी, तुलनात्मक अभ्यास न मांडता, तसेच महापौर आणि परिवहन समितीसाठी प्रतीक्षा न करता करार अंतिम करण्याची घाई का करण्यात आली, हा प्रश्न उपस्थित होत आहे. ‘एमएसआरटीसी’च्या डिझेल बस निविदा मुख्यमंत्र्यांनी रद्द केल्या, कारण इलेक्ट्रिक बस अधिक स्वस्त आणि पर्यावरणपूरक ठरल्या. या पार्श्वभूमीवर, सीएनजी बसचे दर समोर आल्यानंतर देवरे यांनी केंद्राकडून मंजूर झालेल्या ई-बस पीएम योजनेतील कमी दरांशी त्याची तुलना का केली नाही, हा प्रश्न आहे. शिवाय, पोस्ट टेंडर मंजुरीसाठी वरिष्ठ अधिकार्‍यांकडे हे का पाठवले नाही, हाही प्रश्न उपस्थित होत आहे. 

मागील निविदेत यशस्वी ठरलेले तेच पाच कंत्राटदार पुन्हा या पाचशे सीएनजी बस निविदेतही विजेते ठरले. त्यात आणखी एक सध्याचा कंत्राटदार जोडला गेला आहे. इतर कंत्राटदार मात्र प्राथमिक टप्प्यात अपात्र का ठरवले गेले, याचे कारण स्पष्ट झाले नाही. योगायोग म्हणजे, या कंत्राटदारांपैकी दोघांना पूर्वी मुख्यमंत्र्यांनी रद्द केलेल्या एमएसआरटीसी कंत्राटातही काम मिळाले होते.

इतनी जल्दी क्या है?

देवरेंच्या अनुपस्थितीत १९ जानेवारी २०२६ रोजी कोणत्याही वाटाघाटी न करता थेट स्वीकृतीचे पत्र जारी होणे, त्यानंतर अवघ्या ४८ तासांत करारनामा आणि बँक हमी पूर्ण होणे, ही प्रक्रिया घाईघाईची आहे. निवडणूक निकालानंतर आणि महानगरपालिका समित्या अस्तित्वात येण्यापूर्वीच एवढ्या तातडीने निविदा अंतिम करण्यामागचे नेमके कारण स्पष्ट होत नाही. 

संचालक मंडळाची बैठक बोलावण्याची ही पद्धत नसते. तसे मी देवरे यांना स्पष्टपणे कळवले. बैठकीला मी गेलो नाही. बैठक झाल्यानंतर त्या ठरावावर सही करण्यासही मी नकार दिला. मुळात कोणतेही काम पारदर्शक पद्धतीने झाले पाहिजे. ही पद्धत मला चुकीची वाटते.-डॉ. योगेश म्हसे, आयुक्त, पीएमआरडीए

English
हिंदी सारांश
Web Title : PMP's questionable CNG bus deal raises transparency, conflict of interest concerns.

Web Summary : PMPML's CNG bus procurement faces opposition due to alleged lack of transparency. Officials question the process, citing rushed approvals and potential conflicts of interest, particularly regarding contractor selection and rate comparisons. Concerns arise over bypassing established procedures and favoring specific contractors.
टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारPuneपुणेPMPMLपीएमपीएमएल