शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

पु्ण्याचा श्वास असलेल्या तळजाई टेकडीवरून नगरसेवक आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 07:00 IST

तळजाई टेकडी वाचविण्यासाठी प्रयत्न करणा-या नगरसेवकावर प्रशासन गुन्हा दाखल करते ही अत्यंत खेदाची बाब आहे.

ठळक मुद्देसदस्यांना विश्वासात घेऊन प्रकल्पाची माहिती देण्याचे महापौरांचे आदेश                 तळजाई टेकडीवर सिमंटचे जंगल उभे करण्याचा घाट  तळजाई टेकडी येथे १०८ एकरमध्ये  वनउद्यान उभारणी

पुणे : पु्ण्याचा श्वास असलेली व पुणेकरना शुध्द हवा मिळण्याचे एकमेव ठिकाणी तळजाई टेकडीवर सिमंटचे जंगल उभे करण्याचा घाट घातला जात आहे. या चुकीच्या पध्दतीने सुरू प्रकल्पाला विरोध करणा-या, तळजाई टेकडी वाचविण्यासाठी प्रयत्न करणा-या नगरसेवकावर प्रशासन गुन्हा दाखल करते ही अत्यंत खेदाची बाब असल्याचे सांगत महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाच्या विरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या. तसेच तळजाई टेकडी नष्ट करण्याचे काम तातडीने थांबविण्याची मागणी करण्यात आली. याबाबत संबंधित प्रभागाती सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन प्रकल्पाची सर्व माहिती देण्याच्या आदेश महापौर मुक्त टिळक यांनी सभेत दिले.                                                               तळजाई टेकडी येथे १०८ एकरमध्ये  वनउद्यान उभारण्यात येत आहे. यासाठी प्रशासनाने एक विकास आराखडाही तयार केला आहे. सध्या महापालिका प्रशासनाकडून याठिकाणी वाहनतळ उभारण्यात येत आहे. वाहनतळ उभारत असताना झाडांची कत्तल करण्यात येत असून सिमेंटचे जंगल उभे केले जात असल्याने याकामाला स्वीकृत नगरसेवक सुभाष जगताप यांनी विरोध केला होता. प्रशासनाच्या कामात अडथळा आणल्यामुळे जगताप यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.याबाबत मंगळवार (दि.१८)  झालेल्या महापालिकेच्या मुख्य सभेत महापालिका प्रशासनाने तळजाई टेकडी व टेकडीवरील वनराई नष्ट करण्याचा घाट घातला आहे. शहराचे प्रदुषण कमी करण्यासाठी एकीकडे वृक्षरोपण करण्याची नौटंकी केली जाते, परंतु दुसरीकडे नागरिकांनी थेंबथेंब पाणी घालून वर्षनो वर्ष जगवलेली व वाढवलेली झाडे पार्किंग व अन्य प्रकल्पासाठी तोडण्याचा घाट घातला असल्याचे नगरसेवक अश्विनी कदम यांनी सभागृहात स्पष्ट केले.       यावर विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी आपल्या मतदार संघात चुकीचे काम सुरु असल्याचे ते थांबविण्याचा प्रयत्न करणा-या सदस्यांवर गुन्हा देखाल केला म्हणून   प्रशासनाची चांगलीच कान उघडनी केली. ज्या सभासदाने नगरसेवक म्हणून 25 वर्षे महापालिकेची सेवा केली, तळजाई टेकडीवरील वन संपदा टिववण्यासाठी प्रयत्न केला त्यांच्यावर गुन्हा दाखल होणे चुकीचे आहे.त्यामुळे प्रशासनाने याचा खुलासा करण्याची मागणी बराटे यांनी केली.    याबाबत स्पष्टीकरण करताना आयुक्त सौरभ राव यांनी सदस्यांनी कामांची पाहणी करणे काहीच गैर नाही. तळजाई टेकडीचा विकास आराखडा प्रशासनाने तयार केला असून, तो मंजूर आहे. त्यानुसारच येथे काम करण्यात येत आहे. परंतु येथे सुरु असलेल्या पार्किंग शेडच्या कामामध्ये जगताप यांच्याकडून वारंवार अडथळा आणला जात होता.याठिकाणी मारहाणीचा प्रकार घडल्यामुळे प्रशासनाला गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घ्यावा लागला. दरम्यान महापौर मुक्ता टिळक यांनी तळजाई टेकडी येथे राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पाची संपूर्ण माहिती संबंधित सर्व  सदस्यांना देण्याचे आदेश मुख्य सभेत प्रशासनाला दिले.----------नगरसेवकांचे वैयक्तीक आरोप-प्रत्यारोप निवडणुकीमध्ये सुभाष जगताप आणि आबा बागुल हाता-हात घालून मतदान मागायला फिरत होते, मग आता घोडे कुठे अडले सांगत, तळजाई टेकडीवरील वाद हा आघाडीमधील बिघडी आहे, अशी टीका नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांनी सभागृहात केली. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी शिळीमकर याना आजोबांचा सल्ला देऊ नका असे प्रतिउत्तर दिले. यावर शिळीमकर थांबले नाहीत त्यांनी टीका सुरूच ठेवली त्यामुळे काही नगरसेवकांनी शिळीमकर यांच्यावर वैयक्तीक टीका केली.

टॅग्स :PuneपुणेTaljai Tekdiतळजाई टेकडीenvironmentवातावरणPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका