शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

corornavirus : काेराेनाला राेखण्यासाठी पुणे महापालिकेचे स्वच्छता दूत करतायेत जनजागृती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 16:21 IST

काेराेनाबाबत विविध पद्धतीने जनजागृती करण्यात येत आहे. त्यात आता पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थावन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी देखील पुढाकार घेतला आहे.

पुणे : काेराेनाचा प्रभाव राज्यभरात वाढत असल्याचे चित्र आहे. आत्तापर्यंत 52 नागरिकांना काेराेनाची लागण झाल्याचे समाेर आले आहे. त्यातही पुण्यातील काेराेना बाधितांची संख्या अधिक आहे. त्यामुळे सर्वच यंत्रणांकडून खबरदारी घेण्यात येत आहे. पुण्यातील काेथरुड भागातील घनकचरा विभागाचे कर्मचारी घराेघरी जाऊन काेराेनाबाबत जनजागृती करत आहेत. त्याचबराेबर रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर कडक कारवाई करत आहेत. 

पालिकेच्या प्रत्येक आराेग्य काेठी अंतर्गत एक पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाद्वारे प्रत्येक साेसायटी, झाेपडपट्टी, बंगले यांमध्ये जाऊन काेराेनाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. या अभियानात नागरिकांनी सतर्क राहून स्वतःची व इतरांची काळजी घ्यावी, तसेच परदेशातून प्रवास करून आलेल्या नागरिकांची माहिती देऊन त्यांची आरोग्य तपासणी महानगरपालिकेच्या आरोग्य तपासणी केंद्रातील तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत करून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ज्या नागरिकांना ताप, सर्दी, खोकला, घशात खवखव होणे, घसा दुखणे असे होत असेल तर त्वरित करोना व्हायरसची तपासणी करून घेण्यास सांगण्यात येत आहे. याशिवाय तोंडाला मास्क लावणे, आपले हात दिवसातून किमान दहा ते पंधरा वेळा निर्जंतुक साबणाने हात स्वच्छ धुणे, खोकतेवेळी तोंडावर रुमाल किंवा टिश्यू पेपरचा वापर करावा, थंड पदार्थ व शीतपेय सेवन करणे टाळा, पाणी उकळून प्या, अधिक संपर्क टाळा, असे सांगण्यात येत आहे. थुंकी सम्राटांवर गांधीगिरीतून गुलाबाचे फूल देऊन सत्कार करण्यात येत आहे.

काेथरुड परिसरात दोन दिवसात वीस हजार नागरिकांचे काेराेनाबाबत प्रबाेधन करण्यात आले. ही  मोहीम करोनाची भिती आहे तोपर्यंत चालू राहील असे वरिष्ठ आरोग्य निरिक्षक राम सोनवणे यांनी सांगितले. हे अभियान राबविण्यासाठी आरोग्य निरिक्षक सचिन लोहकरे, प्रमोद चव्हाण, गणेश साठे, वैभव घटकांबळे, संतोष ताटकर, नवनाथ मोकाशी, सतीश बनसोडे, शिवाजी गायकवाड, महेश लकारे, मोकादम वैजीनाथ गायकवाड, आण्णा ढावरे, अशोक खुडे, अशोक कांबळे, साईनाथ तेलंगी इत्यादींनी भाग घेतला.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याPuneपुणे