शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: कंटेन्मेंट झोनमुळे गावात जाण्यापासून अडविल्याने महिलेची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 23:54 IST

मंगळवारी शिंगोटे कुटुंबीय उंब्रजला गावी जात होते. त्यांचा टेम्पो पोलिसांनी अडवला. चौकशी करत असताना पोलिसांत आणि शिंगोटे कुुटुंबीयात वाद झाला.

ओझर - जुन्नर तालुक्यातील उंब्रज नंबर १ येथे कंटेन्मेंट झोन असल्याने गावात सोडायच्या कारणावरून पोलिसांसोबत झालेल्या वादावादीनंतर एका महिलेने सर्वासमोर विष पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली.अनुजा रोहिदास शिंगोटे (वय ४५) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.शिंगोटे हे शेतकरी कुटुंब आहे. भाजीपाला ते नेहमी छोट्या टेम्पोतून विक्रीसाठी गावातून बाहेर नेत असतात. उंब्रज येथे चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने पोलीसांनी नाकाबंदी केली आहे. जा-ये करणा-यांची चौकशी केली जाते. मंगळवारी शिंगोटे कुटुंबीय उंब्रजला गावी जात होते. त्यांचा टेम्पो पोलिसांनी अडवला. चौकशी करत असताना पोलिसांत आणि शिंगोटे कुुटुंबीयात वाद झाला.

दरम्यान, वाद विकोपाला गेल्याने अनुजा शिंदे यांनी सर्वांसमोर विष प्राशन केले. त्यांना तातडीने दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी सांगितले की बंदोबस्तास नेमणूक केलेले हवालदार नरसिंगे, एक होमगार्ड आणि दोन आरसीपी महिला कॉन्स्टेबल नाक्यावर होते. त्यांनी शिंगोटे कुटुंबास टेम्पो नेऊ नका, असे सांगत ग्रामपंचायतीने ज्या पर्यायी  मार्गाचा अवलंब केला आहे त्याचा वापर करा, असे सांगितले. परंतु शिंगोटे हे त्याच ठिकाणाहून वाहन नेण्याचा हट्ट करत होते.  सरपंच सपना उमेश दांगट म्हणाल्या कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस बंदोबस्त आहे.तपासनाक्यावर गाडी अडविल्याने शिंगोटे कुटुंबीय पोलिसांशी वाद घालत होते. त्यांचा वाद पाहून शंभरावर ग्रामस्थ जमा झाले होते. त्यांनी समजाविण्याचा प्रयत्न केला दरम्यान रोहिदास यांनी विषाची बाटली आणली. ग्रामस्थांनी त्यांना अडविल्याने बाटली खाली पडली. गोंधळात अनुजा यांनी बाटली उचलत विष प्राशन केले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPuneपुणेSuicideआत्महत्या