शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus भारतीयांना रोगप्रतिकारशक्ती वाचवेल का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 05:37 IST

कोरोना व्हायरसच्या मुद्यावर वैद्यकीय व्यावसायिकांत चर्चा : अभ्यास व संशोधनाची व्यक्त होते आहे गरज

राजू इनामदार।लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : जगण्याच्या लढाईत तिन्ही त्रिकाळ वेगवेगळ्या समस्यांना निधड्या छातीने तोंड देणाऱ्या भारतीयांना आजार काही नवे नाहीत. त्यांचा हा निर्धार गुणसूत्रांमधलाच असला तर कोरोना विषाणूंवरही ते यशस्वी मात करतील, अशी चर्चा वैद्यक क्षेत्रातील जाणकारांमध्ये कोरोना व्हायरसच्या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर सुरू आहे. त्याचाच वेध काही तज्ज्ञ डॉक्टरांबरोबर बोलून घेतला असता त्यांनी यावर अधिक अभ्यास व संशोधन होण्याची गरज व्यक्त केली. प्रत्येक व्यक्तीची गुणसूत्रे वेगवेगळी असतात, मात्र त्यातही प्रदेश, वातावरण, वंश अशा काही गोष्टींचा कणमात्र का होईना एक भाग असतोच, भारतीयांमधील हा भाग या लढाईत कदाचित उपयोगी पडू शकतो, असा एक अंदाज यातून व्यक्त होताना दिसतो आहे.पँथॉलाजिस्ट (एम.डी.) डॉ. मंदार परांजपे यासंबधी बोलताना म्हणाले, जगात सर्वत्र या विषाणूने थैमान घातले आहे. भारतातही तो पोहचलाच आहे. मानवी शरीरात रक्तामध्ये लाल व पांढºया पेशी असतात. त्यातील पांढºया पेशी बाहेरून शरीरात आलेल्या विषाणूंबरोबर लढण्याचे काम करतात. पांढºया पेशी लढत असताना कधीकधी त्यातून घातक असे सायटोकाईन स्टॉर्म निर्माण होते. त्यात ‘आयएल६’हे एक प्रकारचे रसायन निर्माण होते. सायटोकाईन स्टॉर्म हे रुग्णासाठी प्राणघातक ठरू शकते. सायकोकाईन स्टॉर्म निर्माण होण्याची संभाव्यता ही पांढर्या पेशीवर असलेल्या विशिष्ट ‘मून ल्यूकोसाईट अँन्टीजेन नुसार ठरते.डॉ. परांजपे पुढे म्हणाले, भारतीयांच्या पांढºया पेशींवर जे विशिष्ट ‘मून ल्युकोसाईट अँन्टीजेन’ जास्त प्रमाणात आहेत, त्यांच्यामुळे सायटोकाईन स्टॉर्मची संभाव्यता कमी होत असावी आणि त्यामुळेच कदाचित आपल्याकडे या विषाणूपासूनचा मृत्यूदर कमी राहत असावा, असा एक आशावादी शास्त्रीय अंदाज व्यक्त होतो आहे. पण अजून हे संशोधनाद्वारे सिद्धझाले नसल्यामुळे आपण अजिबात गाफील राहून चालणार नाही. आवश्यक ती सर्व काळजी आपण सर्वांनी घेतलीच पाहिजे.भारतीयांची रोगप्रतिकारशक्ती इतरांपेक्षा अधिक चांगली...डॉ. अनंत फडके हेही वैद्यक क्षेत्रातील नावाजलेले तज्ज्ञ आहेत. ते म्हणाले, ‘या मुद्यांवर चर्चा सुरू आहे हे बरोबर आहे, मात्र ती प्राथमिक स्तरावर आहे. हा विषाणू नवा आहे, त्याची लक्षणे नवी आहेत. भारतीयांची रोग प्रतिकारशक्ती अन्य लोकसमूहांपेक्षा निश्चितच चांगली आहे.’४पण या नव्या विषाणूच्या आजारासमोर ती कसा व किती टिकाव धरेल यावर अभ्यास व अधिक संशोधन होण्याची गरज आहे. तसा अभ्यास व संशोधन सुरूही असेल किंवा आहे. त्यातून पुढे काही शास्त्रीय कसोटीवर सिद्ध झाले तरच यावर खात्रीपूर्वक बोलता येईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या