शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून घेण्यात येतीये खबरदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 15:26 IST

काेराेनाचा सामना करण्यासाठी ट्रव्हल्स कंपन्या बसेस सॅनिटाईझ करुन मार्गावर साेडत आहेत.

पुणे : काेराेनाचा सामना करण्यासाठी प्रत्येकजण आपआपल्या परीने उपाययाेजना करताना दिसत आहे. पुण्यातील हाॅटेल देखील बंद ठेवण्याचा निर्णय आता हाॅटेल व्यावसायिकांनी घेतला आहे. त्यातच आता खासगी ट्रॅव्हल्स देखील आपल्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रवास सुरु हाेण्याआधी संपूर्ण बसमध्ये औषधांची फवारणी करत आहेत. त्याचबराेबर नागरिकांना देखील हॅण्ड सॅनिटाईझर देण्यात येत आहे. 

पुण्यात आणखी एका महिलेला काेराेनाची लागण झाल्याचे समाेर आले असून आता पुण्यातील काेराेनाग्रस्तांची संख्या 18 झाली आहे. तर राज्यातील आकडा 42 वर जाऊन पाेहचला आहे. काेराेनाचा प्रसार वाढू नये यासाठी सर्वच स्तरातून खबरदारी घेण्यता येत आहे. या आधीच राज्यातील शाळा महाविद्यालये बंद करण्यात आली हाेती. त्यानंतर आता पुण्यातील दुकाने तसेच हाॅटेल देखील तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येत आहेत. 

पुण्यात राज्यभरातील विविध भागांमधून नागरिक येत असतात. त्यात खासगी ट्रॅव्हल्सने येणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे आता या ट्रॅव्हल्सने येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेची खबरदारी देखील ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून घेण्यात येत आहे. पुण्यातील नवकार  ट्रव्हल्सच्या सर्व बसेस मार्गावर जाण्याआधी सॅनटाईझ केल्या जातात अशी माहिती या ट्रव्हल्सचे मालक अतिश जैन यांनी दिली. त्याचबराेबर बस मार्गावर जाण्याआधी आणि मार्गावरुन आल्यावर देखील संपूर्ण बस स्वच्छ करुन सॅनटाईझ केली जात आहे. त्यात बसमधील पडद्यांपासून ते सीटपर्यंत सर्वच निर्जुंतिकरण केले जाते. तसेच प्रवाशांना देखील बसमध्ये प्रवेश करण्याआधी हॅन्डसॅनिटाईझरने हात स्वच्छ करण्यास सांगण्यात येत आहे. 

दरम्यान पुण्यात काेराेनाचा प्रादुर्भाव अधिक असल्याने बाहेरील नागरिक आपआपल्या गावी परतले आहेत, तसेच पुण्यात येणाऱ्या ट्रव्हल्स देखील माेकळ्या येत आहेत. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याPuneपुणेtourismपर्यटन