शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : पुणे विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची कसून तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2020 13:50 IST

लोकमत ऑन दि स्पॉट : कोरोना व्हायरस प्रवाशांमध्ये मुळे भीती व चिंतेचे वातावरण

ठळक मुद्देनागरिकांच्या सेवेसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची टीमआतापर्यंत १,४१४ प्रवाशांची तपासणी केलीपुणे विमानतळावर परदेशातून एका आठवड्यात येतात १० फ्लाइट

अमोल अवचिते / नितीन मोहिते- पुणे : कोरोना व्हायरसमुळे जगभर चिंतेचे वातावरण आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंत्रणांकडून दक्षता घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर, पुणेविमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून कसून तपासणी करण्यात येत आहे. पुणे विमातळावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात येत आहे. विमान पोहोचण्यापूर्वी प्रवाशांना एक फॉर्म भरण्यास सांगितला जातो. प्रवाशाचे पूर्ण नाव, पत्ता, संपर्क क्रमांक अशी माहिती भरून घेण्यात येते.तसेच या फॉर्ममध्ये सर्दी, ताप, श्वास घेण्यास त्रास अशी काही लक्षणे आहेत का? याची माहिती भरण्यास सांगितली जाते. त्यानुसार प्रवासी माहिती भरून फॉर्म बाहेर पडणाऱ्या गेटमधून जाताना डॉक्टरांकडे जमा करतो.  इन्फ्रारेड थर्मामीटरने व्यक्तीचे तापमान मोजले जाते. जे तापमान मोजले जाईल, त्याची नोंद फॉर्मवर केली जाते. ...........

आतापर्यंत १,४१४ प्रवाशांची तपासणी केलीपुणे विमानतळावर परदेशातून एका आठवड्यात १० फ्लाइट येतात. दुबईवरून येणारी रोज एकतरी फ्लाइट असते. पहाटे साडेचार आणि रात्री दीड वाजता अशा दोन फ्लाइट आहेत. कोरोना नवीन व्हायरस असल्याने प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. प्रवाशांकडून योग्य ती काळजी घेतली जात आहे. प्रवाशांसाठी तत्पर सेवा देण्यात आली आहे. औंध रुग्णालय, येरवडा मेन्टल रुग्णालय, ससून रुग्णालय या तीन रुग्णालयांतील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम सेवेसाठी आहे. आतापर्यंत १४१४ प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे, असे डॉक्टरांनी ‘लोकमत’ला सांगितले. ......................कोरोनाबद्दल पुणे विमानतळावर पूर्ण काळजी घेतली जात आहे. भारत सरकारने केलेल्या सूचनांचे बारकाईने पालन केले जात आहे. विमानतळ विभागाची एक आणि शासनाची एक रुग्णवाहिका अशा दोन रुग्णवाहिका सेवेसाठी ठेवण्यात आल्या आहेत. परदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची कसून चौकशी केली जात आहे. वेळोवेळी स्वच्छता करण्यात येत आहे. -कुलदीप सिंग, संचालक, पुणे विमानतळ. ...........दुबईला मुलगा राहत असल्याने नेहमी तिकडे जाणे असते. कोरोनोमुळे गर्दी कमी झाल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या भीतीमुळे दुबईमध्ये बाहेर कुठे फिरलो नाही. काही खरेदी केली नाही. तिथून विमानात बसताना कोणतीही तपासणी केली गेली नाही. पुण्यात मात्र तपासणी केली गेली. योग्य काळजी घेण्याच्या सूचना डॉक्टरांनी दिल्या आहेत. - रजनी नाडकर्णी, तळेगाव ढमढेरे..........दुबईतील नागरिकांमध्येही भीती असल्याचे दिसून येत आहे. मॉल, हॉटेल मोकळे पडत आहेत. प्रत्येकाला स्वत:च्या जीवाची काळजी आहे. दुबईतील स्थनिक नागरिकांमध्ये असल्यामुळे काही भीती जाणवली नाही. दुबईतून पुण्यात येताना कोणत्याही प्रकारची तपासणी केली गेली नाही. पुण्यात पोहचताच विमानतळावर तपासणी केली जात आहे.- अक्रम अली मदारी, प्रवाशी...............  

टॅग्स :PuneपुणेAirportविमानतळairplaneविमानpassengerप्रवासीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस