शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

coronavirus : पुण्यात ‘होम क्वारंटाइन’ आदेश असलेले काही जण बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 09:02 IST

कुठे दिसल्यास हेल्पलाईनला संपर्क साधण्याचे आवाहन, पोलीसही ठेवणार नजर

पुणे : परदेशातून आलेले व ज्यांना ‘होम क्वारंटाइन’ राहण्याचा आदेश दिला आहे. अशांपैकी काही जण त्यांच्या घरी आढळून आलेले नाही. त्यामुळे त्यांनी हेल्पलाईनशी संपर्क साधावा अथवा जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क करावा, असे पुणे पोलिसांनी आवाहन केले आहे. अथवा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये, यासाठी सर्व प्रकारची काळजी घेतली जात आहे. परदेशातून आलेल्या परंतु, कोणतीही लक्षणे नसलेल्यांना १४ दिवस होम क्वारंटाइन राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांच्या हातावर होम क्वारंटाइन असा शिक्काही मारण्यात आला आहे.पुणे पोलिसांनी पुणे शहरातील होम क्वारंटाइन केलेल्यांची यादी मागून घेऊन त्यांच्यावर नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पुणे पोलिसांच्या १३६ पथके या नागरिकांवर लक्ष ठेवून आहेत. या यादीनुसार पोलिसांनी घरी जाऊन पाहणी केली असता बहुतांश लोक त्यांच्या घरी आढळून आले. मात्र, होम क्वारंटाइन चा आदेश दिलेल्यापैकी काही जण त्यांनी दिलेल्या पत्त्यावर आढळून आले नाही. बेपत्ता झालेले हे नागरिक कदाचित त्यांच्या गावी अथवा दुसरीकडे वास्तव्यास गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या नागरिकांनी तातडीने १८००२३३४१३० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे. जर त्यांनी आरोग्य विभागाने दिलेल्या आदेशाचे पालन केले नाही तर, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र