शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

coronavirus : पुणे ग्रामीण पोलीस दलाचे ‘स्मार्ट वर्कींग’, किराणा खरेदीसाठी केली ‘अ‍ॅप’निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2020 21:57 IST

भिलवाडा पॅर्टनच्या धर्तीवर बारामती शहर सीलबंद करण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी बारामती पॅर्टनचा अवलंब करण्यात येतआहे.

 बारामतीबारामती शहरात कोरोनाचे  ६ रुग्ण आजपर्यंत आढळले आहेत. त्यापैकी एका ज्येष्ठ नागरिकाचा काही दिवसापूर्वी मृत्यू झाला आहे. मात्र त्यानंतरकोरोनाच्या रुग्णांचा संसर्ग वाढू नये यासाठी खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातले आहे. त्यासाठी पवार यांनी प्रशासनाला काटेकोरपणे नियोजन करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार प्रशासनाच्या वतीने गेल्या तीनदिवसांपासून विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. भिलवाडा पॅर्टनच्या धर्तीवर बारामती शहर सीलबंद करण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी बारामती पॅर्टनचा अवलंब करण्यात येतआहे.त्यापाठोपाठ पोलीस प्रशासनाने आज पुणे ग्रामीण पोलीस दल कोवीड १९टीमच्या वतीने बारामती शहरामध्ये आॅनलाईन किराणा माल खरेदीसाठीअ‍ॅप्लीकेशनची निर्मिती केली आहे.त्यामुळे बारामतीकराना घराबाहेर पडण्याची संधीच न मिळण्यास प्रशासन यशस्वी पाउले टाकत आहे . त्यासाठी रविवारी (दि 12)पोलीसानी सोशल मिडीयाद्वारे हि संकल्पना, त्या आप ची लिंक नागरिकांपर्यंत पोहचवली .पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी याबाबत माहिती देताना संगीतले कि ,  वापरण्यासाठी अतिशय सोपे आहे. ‘किराणा होम डिलिव्हरी’ असे या अ‍ॅपचे नाव आहे. अवघ्या चार ते पाच मिनिटात हे अ‍ॅप इन्स्टॉल करता येते. त्यानंतर याच अ‍ॅपवर नागरिकांना कौटुंबिक गरजेसाठी हवे असलेल्या किराणामालाची यादी त्यावर पाठविण्याची सोय करण्यात आली आहे. यामध्ये संबंधित नागरिकाने त्याला आवश्यक असलेल्या किराणा मालाची आॅर्डर मराठी किंवा इंग्रजीमध्ये लिहून जवळच्या किराणा दुकानदार किंवा मॉलला पाठविण्याची सोय या अ‍ॅपमध्ये करण्यात आली आहे. हा किराणा माल आणण्यासाठी नागरिकांनी किराणा दुकानात, मॉलमध्ये जाण्याची गरज नाही. बारामती पॅर्टनमधील स्वयंसेवक, किंवा ते दुकानदार स्वत:ची माणसे पाठवून माल पोहोच करणार आहेत. नागरिकांनी या अ‍ॅपवर  मागणी केलेल्या मालाची आॅर्डर दुकानदाराला त्याच्या मोबाईलवर मिळणार आहे. त्यानंतर दुकानदार आॅर्डर प्रमाणे आवश्यक माल ग्राहकाच्या घरी पोहोचविण्याची सोय करेल. यामध्ये दुकानदाराचा मोबाईलनंबर देखील अ‍ॅपवर आहे. त्यामुळे ग्राहक दुकानदारांना देखील संपर्क करून आवश्यक मालाची माहिती देऊ शकतात. शिवाय यादी पाठविल्यानंतर ग्राहकाचा नंबर दुकानदारांपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे दुकानदार देखील ग्राहकांनासंपर्क करू शकतील. पोलिसांच्या वतीने निर्मिती केलेल्या या अ‍ॅपचे बारामतीकरांनी स्वागत केले आहे. या अ‍ॅपमुळे नागरिकांना घराबाहेरपडण्याची आवश्यकता नाही. परिणामी शासनाने जाहीर केलेला लॉकडाऊन प्रभावीपणे यशस्वीपणे मदत होणार आहे. नागरिक घराबाहेर न पडल्याने कोरोनाचे संसर्ग कायमचा नष्ट होण्यासाठी पोलिसांचे हे नियोजन उपयुक्त ठरणार आहे.पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मिना, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, मुख्याधिकारी योगेश कडुसकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, पोलीस निरीक्षक औदंबर पाटील, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना घरपोच किराणा माल देण्यासाठी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस जवान स्वप्नील अहिवळे, विशाल जावळे, सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, शर्मा पवार, अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय, बारामती नगरपरिषद आरोग्य विभागाने हे अ‍ॅप तयार केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPuneपुणेBaramatiबारामतीPoliceपोलिस